मंगलगेटला मोफत नेत्र तपासणी शिबिर यशस्वीपणे संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी) :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह, मंगलगेट, अहमदनगर येथे नगरसेवक योगीराज गाडे व थोरात आय केअर आणी अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर व नंबरचे चष्मा वाटप कार्यक्रमाचा मोठ्या उत्साहाने पार पडले. शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि मोफत नेत्र तपासणी तसेच नंबरचे चष्मा वाटपाचा लाभ घेतला.
यावेळी प्रा शशिकांत गाडे ,खासदार निलेशजी लंके आणि शशिकला अनिलभैय्या राठोड यांनी शिबिराला आपला पाठिंबा देऊन कौतुक केले तर अनेक मान्यवरांनी शिबिराला भेट दिली , या शिबिरासाठीअरुण झेंडे,*मुन्ना भिंगारदिवे,श्याम सोनवणे,बाळासाहेब झरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
आपल्या नेत्रांच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, आणि अशा उपक्रमांद्वारे आपण सर्वांनी एकत्र येऊन समाजाला मदत केली पाहिजे शिबिरात सुमारे ९०० च्या पुढे लोकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली तर ५०० लोकांना नंबरचे चष्मा वाटप करण्यात आले असे योगीराज गाडे यांनी सांगितले
.webp)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com