Kalyan Road Ahmednagar: कल्याण रोड सीना नदीवरील खराब रस्त्याची आ.संग्राम जगताप यांनी केली पाहणी
अहमदनगर (प्रतिनिधी) कल्याण रोड सीना नदीवरील खराब रस्त्याची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली. यावेळी मंजूर रस्त्याचे काम तातडीने सुरू करून तातडीने तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावरील खड्डे बुजून द्यावेत अशी सूचना राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे अभियंता तारडे यांना दिली. त्याचबरोबर अमरधाम गेट शेजारील मातीचा ढिगारा तातडीने उचलण्याच्या सूचना ही यावेळी दिल्या.
कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग असून अहमदनगर शहरातून जात आहे. सीना नदीवरील पुलाचे काम मार्गी लागावे, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून त्यांनी २७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आता पुलाचे काम सुरू झाले आहे, याचबरोबर जाधव पेट्रोल पंप ते नालेगाव अमरधाम गेटपर्यंत रस्त्याचे काम देखील लवकरच मार्गी लागणार आहे.
मात्र सध्या रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून यावर मोठमोठे खड्डे पडले आहे, त्यामुळे छोटे-मोठे अपघात होत असून दररोज वाहतूक कोंडी देखील होत आहे, त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तरी तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावरील हे खड्डे बुजून द्यावेत जेणेकरून नागरिकांना पावसाळ्यात वाहतुकीस त्रास होणार नाही, अशा सूचना यावेळी आ जगताप यांनी दिल्या. नागरिकांनी ही या कामामध्ये सहकार्य करावे.
यावेळी मनपा आयुक्त यशवंत डांगे, राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे अभियंता तारडे, मनपा शहर उपअभियंता श्रीकांत निंबाळकर, महेश लोंढे, सारंग पंधाडे, हरिभाऊ येलदंडी, सनी शिंदे आदींसह नागरिक उपस्थित होते.
.webp)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com