सामाजिक अध्यात्मिक कार्यातून आपल्या कामाचा वेगळा ठसा भाऊंनी उमठविला-आ.संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी) :
सामाजिक आयुष्यात अनेक समस्या असतात. त्यांचा यशस्वीपणे सामना करीत समाजासाठी काम करण्याचे ध्येय समोर ठेवून सर्वसामान्य माणसांसाठी भीमराज आव्हाड यांनी काम केले. त्यामुळे कार्यकर्त्यांचे ते भाऊ झाले तर सर्वसामान्यांसाठी मामा म्हणून ओळख निर्माण केली.आजही अन्यायाविरुद्ध लढत अनेक प्रश्नांसाठी पुढाकार घेतात. सामाजिक कामातून ते अध्यात्मिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देत काम करीत राहिले व आपल्या कामाचा वेगळा ठसा त्यांनी उमठविला असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
निर्मल नगर येथील श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भीमराज आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त आ. संग्राम जगताप यांनी सत्कार करून अभिष्टचिंतन केले यावेळी राहुल सांगळे, संतोष ढाकणे, किरण लटपटे, प्रताप भिंगारदिवे, आकीब शेख, वैभव ढाकणे, अभिषेक हरबा,अमर भोसले, निलेश नेहुल, जितू पाटील तसेच प्रतिष्ठानचे सदस्य, मित्र मंडळ उपस्थित होते.
आ. जगताप पुढे म्हणाले भीमराज आव्हाड यांचे ग्रामीण भागातील काम चांगले असून पांगरमल गावाचा विकास करून गावातील अनेक प्रश्नांना प्राधान्य देताना आंदोलने, मोर्चेकाढून सर्वसामान्य लोकांना न्याय दिला. त्यांच्या या कामामुळे शहरातही कार्यकर्त्यांची मोठी ताकद त्यांच्यामागे असल्याने उपनगरातील विविध प्रश्नांना न्याय देण्यासाठी ते झगडतात त्यांच्या या कामामुळे कार्यकर्तेसदैव पाठबळ देत असतात.
यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री. भीमराज आव्हाड म्हणाले नगर शहराला आ. जगताप यांचे नेतृत्व लाभल्याने शहराबरोबरच उपनगराचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे कार्यकर्त्यांसह आम्ही उभे राहून त्यांचे काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
.webp)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com