Sheikh Hasina: अखेर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला
Sheikh Hasina: बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनानंतर अखेर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. हसीना यांनी राजीनामा द्यावा ही आंदोलकांची मुख्य मागणी होती.
शेख हसीना यांच्या पंतप्रधानपदाची दुसरी कारकिर्द 2009 साली सुरु झाली होती. त्या राजधानी ढाकामधून लष्कराच्या हेलिकॉप्टरनं भारतामधील सुरक्षित स्थळी दाखल झाल्या असल्याची शक्यता आहे, अशी माहिती रॉयटर या न्यूज एजन्सीनं दिली आहे.
'आम्ही सरकार चालवणार'
बांगलादेशमध्ये आरक्षण विरोधी हिंसाचार गेल्या महिन्यात सुरु झाला. त्या हिंसाचाराला गेल्या काही दिवसामध्ये 'शेख हसीना हटाव'चं स्वरुप आलं होतं. हसीना यांनी अखेर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकार-उज-जमान यांनी पत्रकार परिषद घेतली.
जमान यांनी सांगितलं की, 'तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करु. आम्ही देशात शांतता परत आणू. आम्ही या देशात अंतरिम सरकार चालवू. तोडफोड आणि जाळपाळोपासून दूर रहा. तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर परिस्थिती सुधारेल. हिंसाचार आणि मारहाणीतून काहीही साध्य होणार नाही. अराजकतेपासून दूर राहा.'
45 मिनिटांचा कालावधी
शेख हसीना आणि त्यांच्या लहाण बहिणीनं वाढता विरोध लक्षात घेऊन पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हसीना यांना पद सोडण्यासाठी लष्करानं फक्त 45 मिनिटांचा कालावधी दिला होता.
शेख हसीना यांना देश सोडण्यापूर्वी देशवासियांना संबोधन करण्याची इच्छा होती. पण, त्यांना ती परवानगी देखील देण्यात आली नाही. बांगलादेश लष्करानं सर्व कारभार हाती घेतल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
देशभरात संचारबंदी
बांगलादेश सरकारनं हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालय आणि बाजारपेठांना 3 दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. देशात सुरु असलेल्या हिंसाचारामुळे अनेक रेल्वे पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाही करण्यात आला आहे.
पहा व्हिडीओ
#BREAKING: Bangladesh Prime Minister Sheikh Hasina has landed in Agartala, the capital city of Indian state of Tripura as per reports. Agartala is the closest Indian city to Dhaka. Below visuals of Sheikh Hasina along with her sister escaping in a Bangladesh Air Force chopper. pic.twitter.com/JqeDS8BnAy
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) August 5, 2024
"शेख हसीना" ने अपना देश छोड़ा |
— Mohammad Umair (@Umair_3412) August 5, 2024
|
#SheikhHasina Dhaka #stockmarketcrash #Japan #stockmarketsindia #Iran #Riots #Bangladesh #Article370 pic.twitter.com/evEvtbjau6
साभार सौजन्य ABP न्यूज
#BREAKING | दिल्ली एयरपोर्ट से सीधे लंदन जाएंगी शेख हसीना : सूत्र #Bangladesh | #Dhaka | #SheikhHasina | #India | #DelhiAirport | #BangladeshProtests pic.twitter.com/YTLDOWAGv1
— NDTV India (@ndtvindia) August 5, 2024
साभार सौजन्य ndtv
सौजन्य BBC Newsबांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देश सोडून का गेल्या?#bangladesh #sheikhhasina pic.twitter.com/Z0YlaPacpP
— BBC News Marathi (@bbcnewsmarathi) August 5, 2024
.webp)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com