Vinesh Phogat: अंतिम फेरीत पोहोचणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ; भारताचं चौथं पदक निश्चित
Vinesh Phogat: भारताची धाकड कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे आणि म्हणून पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे. कुस्तीच्या ५० किलो गट उपांत्य फेरीत विनेश फोगटचा सामना क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझशी झाला.
विनेश फोगटने या सामन्यात ५-० असा विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर तिने भारताचे सुवर्ण किंवा रौप्य पदक निश्चित केले आहे.
उपांत्य सामन्यात विनेश फोगटने पहिला गुण मिळवला होता. पहिल्या फेरीत विनेश फोगटने क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझला एकही संधी दिली नाही. क्युबाच्या लोपेझने विनेश फोगटच्या पायांवर सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु विनेश फोगटच्या चांगल्या बचावामुळे तिला गुण मिळवता आला नाही.
यानंतर विनेश फोगटने सलग दोन गुण घेत सामन्यात ५-० अशी आघाडी घेतली. सामन्याच्या अखेरीस युस्नेलिस गुझमन लोपेझने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु विनेश फोगटने तिला कोणतीही संधी दिली नाही आणि एकतर्फी विजय मिळवला.
विनेश फोगटने चार वेळा विश्वविजेत्या सुसाकीचा पराभव केला
उपांत्यपूर्व फेरीत चुरशीच्या लढतीत विनेश फोगटने युक्रेनच्या ओसाना लिवाचचा ७-५ असा पराभव केला. याशिवाय पहिल्या सामन्यात तिने जपानच्या युई सुसाकीचा ३-२ असा पराभव केला. चार वेळा विश्वविजेत्या सुसाकीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
पहा विनेशचा धाकड व्हिडीओ
दबदबा कायम
— Rajuram Khoja (@Rajuramkhoja52) August 7, 2024
"इतिहास में अपना नाम सुनहरे अक्षरों में लिख दिया विनेश ने"
आज बधाई रुकनी नही चाहिए
विरोधियों के मुंह पर करार तमाचा दिया है विनेश ने#विनेश_फोगाट #GOLD #OlympicGames pic.twitter.com/JYCaelAsPf





0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com