मानो ! याना न मानो ; श्रद्धा की अंधश्रद्धा!
मुख्यत्वेकरून मानवजातच श्रध्दा आणि अंधश्रध्देला खतपाणी घालून या घटनेला अनेकजण बळी पडलेले आपण बघितले. विज्ञानयुगातही मानवाने केलेली प्रगती दिसत असली तरी, कुठे तरी आपण श्रध्दा ठेवत डोळसपणे मार्गक्रमण केलेच पाहिजे. श्रद्धा की अंधश्रद्धा! यावर विचार केल्यास मानवाने अंधश्रद्धेला छेद दिलाच पाहिजे. मानवजातच श्रध्दा आणि अंधश्रध्दा मानत आली .
प्राण्याला कसली श्रध्दा आणि अंधश्रध्दा! उलट प्राणीमात्रांचे आवाजाचे संकेत शुभ अशुभ मानत आलो. मानवच अद्याप तरी पाळत आला आहे. लिंबू म्हटलं की, अनेकांना सरबत अथवा जेवतांना हमखास लागतंच. अनेकांना तर नाव घेताच तोंडात पाणी येते, लिंबाचा वापर फारच उपयुक्त असतो. परंतु ब-याच लोकांच्या मनात रस्त्यावर पडलेला लिंबाबाबत अंधश्रद्धेपोटी भीतीही तितकीच असते.
कोविड काळात घडलेले प्रसंग माणसा़नी अनुभवले. आप बीती काय असते ती प्रत्येकाने त्यावेळी अनुभवली. अंधश्रद्धेला माणूस किती घाबरतो. याचे उदाहरणही प्रत्येकाकडेच आहे. माझे काम आटोपून निगडीला जाण्यासाठी मी म.न.पा.च्या दिशेने निघालो. संध्याकाळ होत आली तरी उन्हाची तीव्रता तितकीच. प्रचंड उकाडा, भर उन्हात निघालो. तो दिवस होता अमावास्येचा.
बालगंधर्व ते मनपा च्या दिशेने उजवीकडे नदीवर छोटा पूल आहे. तिथे तिहेरी मार्ग मिळतात, दोन्ही बाजूला फुटपाथ आहे. खाली कोणी तरी फेकून दिलेले अर्धी पाटीभर लिंबं व अनेक रंग एका कॅरी बॅग मध्ये रोडवर दबलेल्या स्थितीत पडलेले दिसली . वाहनाची वर्दळ तर होती, ये जा करणारे पण. त्यात ऐन गर्दीच्या वेळेस लोकांना जाण्याची येण्याची घाई, सगळे लोकं बाजूंने जाताना त्या पडलेल्या कॅरी बॅगकडे तिरप्या नजरेने बघत.
मनात येईल तशा शिव्याशाप देऊनच पुढे जात असे. कोणी जादू टोणा, तर कोणी करनी, तर कोणी काही तरी मनात पुटपुटत होते. एक उच्चशिक्षित तरणाबांड पुणेकर पुण्यासारख्या शहरात पण ल़ोक एवढं मागे राहिलेले ! असे बोलून पुढे निघून गेला. मी पण त्यांच्या मागे म.न.पा. बस स्टॉप पर्यंत आलो .बस निगडी साठी निघाली. बसमध्ये पण बसले लोक त्याच विषयी बोलत होते, कोणी म्हणे लिंबा वरून पाय गेला अन् मुलगी आजारीच पडली. कोणी म्हणे येथे बरेच खुन झालेले आहेत, कोणी म्हणे येथे बरेच अपघात झालेले आहे. जेवढी तोंड तेवढी बोली.
शेवटी निगडीचा स्टॉप आला. मी पाहुण्याकडे गेलो, परत सकाळी निगडीहुन बालगंधर्वला ११ च्या सुमारास तिथेच पोहोचलो, परत कालच्या घटनेची आठवण आली. मी त्याच ठिकाणी उभा होतो. एक लिंबू सरबतवाला आपली हातगाडी घेऊन जात होता, तो लिंबू आवळून एका मोठ्या कॅरी बॅग मध्ये टाकत होता. ग्लास मध्ये विविध रंग टाकत असे व ग्लास फुल भरला तर ते त्या कॅरी बॅग मध्ये टाकत होता. न राहवून मी त्याला शेवटी विचारलेच. नंतर ह्या कॅरी बॅगचे तुम्ही काय करता ? तो म्हणाला कचरा कुंडीत टाकतो, मात्र कधी कधी गाडीच्या खालच्या भागातून रोडवर कधी पडुन जातं हे लक्षात पण येत नाही. त्याचे बिनधास्त बोलणे ऐकून मी मात्र स्तब्धच झालो.
काल पासून लोकांच्या विचार ऐकून ऐकून आपल्याही मनात अनेक नकारात्मक विचार आले, परंतु ते सर्व निरर्थक ठरले! थोडा वेळ विचार केला. तल्लफ झाली म्हणून एका चहाच्या टपरीवर स्पेशल कट घ्यावा म्हणून गेलो. तर तिथेही टपरी वाल्याची सकाळची साफ सफाई नेमकी झालेली होती.
पाहतो तर काय बाहुली आणि लिंबं पडलेली दिसली. टपरीवाल्याने ती दोन दिवसापूर्वीच गाडीला बांधली होती .एक तिरपा कटाक्ष टाकत लिंबाला कट मारला अन टपरीच्या बाजूला येऊन उभा ठाकलो. फक्कड गरमागरम वाफा सोडणारा चहाचा कट घशात ओतला .टपरीवर चहासाठी वर्दळ सुरूच होती. क्षणभर विचार केला. अन निघालो पुढच्या कामाला. न पाहिलेल्या वस्तूवर माणसे किती नकारात्मक विचार करतात. काय म्हणावे याला ? अंधश्रद्धा ! की अजून काही !!
शेख ईदरीस
अध्यक्ष
जे.एन.यु.सी.
संगमनेर 9890524092

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com