श्रीमती सुमन बाळासाहेब रोडे (आक्का) 35 वर्षाच्य प्रदिर्घ सेवेतुन कै.बाळासाहेब देशपांडे हॉस्पीटल मधुन निवृत्त ; आ.संग्राम जगताप यांच्या वतीने खास सन्मान
अहमदनगर जिल्ह्यामध्ये महिलांसाठी सुप्रसिद्ध असलेले कै.बाळासाहेब देशपांडे हॉस्पीटल (आरोग्यविभाग) मधून 35 वर्षांच्या प्रदिर्घ सेवेतुन श्रीमती सुमन बाळासाहेब रोडे या निवृत्त झाल्या.
आक्का नावाने प्रसिद्ध असलेल्या श्रीमती रोडे यांना रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानली. अंसख्य महिला रुग्णांची सेवा केली. पतीच्या निधनानंतर संपुर्ण कुटूंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. कै.बाळासाहेब निवृत्ती रोडे हे अहमदनगर पालिके मध्ये जकात विभागात कार्यरत होते.
त्यांच्या निधनांनंतर अनुकंपा तत्वाखाली त्या कै.बाळासाहेब देशपांडे हॉस्पीटल मध्ये आया म्हणुन रुजु झाल्या. अंत्यत प्रेमळ, सुस्वभावी, कायम रुग्णसेवेस तप्तर असणार्या श्रीमती रोडे यांनी असंख्य महिला रुग्णांची मदत केली सेवा केली. कोविड काळात त्यांचा कामाची खास प्रशंसा झाली.
त्यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमाप्रसंगी माननीय आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी ते महापौर असतांना कै.बाळासाहेब देशपांडे हॉस्पीटल मधील आक्का यांचे रुग्णसेवेचे अनुभव कथन केले. तसेच पतिच्या निधनांनतर दोन मुले एक मुलगी यांचे छान संगोपन केले. त्यांचे कार्य खुपच इतरांना प्रेरणा देणारे आहे.
आ. संग्रामभैय्या जगताप यांच्या हस्ते त्यांच नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक दुर्याधन कासार, ह.भ.प.जालिंदर महाराज नरोडे, सोपान कदम, संतोष कांडेकर, नासरायण रोडे, डॉ.राजुरकर साहेब हे उपस्थित होते.
.webp)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com