Dr.Vikhe Patil College | डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष स्वागत
अहमदनगर : दर्शक ।
नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थी घडविण्याची येथील शिक्षक व व्यवस्थापन यांची सर्वतोपरी संयुक्त जबाबदारी आहे. नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे डॉ. विखे पा. अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच नवनवीन उपक्रमांचे आयोजन करुन तांत्रिक शिक्षण व कौशल्य विकास घडवण्याचे काम करेल अशी ग्वाही दिली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच वेगवेगळ्या कीडा व कला या सारख्या कार्यक्रमामध्ये मनमोकळया मनाने सहभागी होण्याचा कानमंत्र दिला त्यांनी यावेळी महाविद्यालयाने उपलब्ध करुन दिलेल्या नोकरीच्या संधीचे मनापासून कौतुक केले व नोकरीच्या संधी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन धनश्री विखे पाटील यांनी केले.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून फाउंडेशनच्या संचालिका सौ .धनश्री सुजय विखे पाटील, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय नाईक, जनरल सेक्रेटरी डॉ. पी. एम. गायकवाड, उपसंचालक सुनील कल्हापुरे, डॉ. सतीश मरकड, डॉ. संदीप उदावंत उपस्थित होते.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे सेक्रेटरी जनरल डॉ.पी.एम. गायकवाड यांनी नवीन विद्यार्थ्यांने महाविद्यालयात स्वागत करुन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे उपसंचालक श्री. सुनिल कल्हापुरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विखे पाटील फौंडेशन है नगर जिल्हयातील अग्रगण्य शिक्षण संस्था असल्याचा आवर्जुन उल्लेख केला. विखे पा. फौंडेशन अंतर्गत असलेले सर्व महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या प्रगती व नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध करुन देण्यात तत्पर असल्याचे नमूद केले तसेच महाविद्यालय हे नेहमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन संधी उपलब्ध करुन देते. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयाने अॅलपल सेंटर ऑफ एक्सलन्स व सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जापनीज लँग्वेज याची सुरुवात झालेली असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत असल्याचे सांगितले. अभियांत्रिकी महाविद्यालय हे नगर जिल्हयातील सर्वांत जास्त नोकरीच्या संधी देणारे महाविद्यालय बनले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय नाईक यावेळी म्हणाले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे विद्यार्थ्यांसाठी कसे फायदेशीर आहे व त्याचा लाभ या महाविद्यालयात कसा मिळेल हे आपल्या मनोगतातून विशद केले आपले महाविद्यालय हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटीबध्द असेल असेही नमूद केले. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यालयाने उपलब्ध करुन दिलेल्या नोकरीच्या संधीचा पुरेपूर फायदा करुन घेण्यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रशिक्षण येथेच करुन देण्याचे आश्वासन दिले, तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तुम्ही एका भविष्याच्या दारात उभे आहात असे सांगून या संधीला उत्साहाने आणि खुल्या मनाने स्विकारा.
तुमचा प्रवास आव्हानांनी भरलेला असेल. पण त्याचवेळी शोध आणि यशाचे क्षण असतील, जे तुम्हाला उद्याचे अभियांत्रिकी तज्ञ बनवतील. अभियांत्रिकी फक्त तांत्रिक कौशल्ये मिळवण्याबद्दल नाही, तर ते विचारक्षमतेने विचार करण्याबद्दल, नैतिकतेने वागण्याबद्दल आणि समाजासाठी योगदान देण्याबद्दल आहे. इथे तुम्ही बांधलेल्या पायावर तुमचे करीअर उभे राहील ते समाजावरही प्रभाव टाकेल. असे सांगितले.या कार्यक्रमासाठी विखे पा. फौंडेशन अंतर्गत सर्व संस्थांचे प्राचार्य, डायरेक्टर, अभियांत्रिकीचे सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सतिश मरकड, कोऑर्डिनेटर डॉ. संदिप उदावंत यांनी परिश्रम घेतले.
संस्थेचे चेअरमन श्री. राधाकृष्ण विखे पाटील तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माजी खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी तसेच संस्थेचे सेकेटरी डॉ. पी. एम. गायकवाड यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात नवीन प्रवेशीत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com