अष्टविनायक मित्र मंडळाच्या बाल कार्यकर्त्यांनी सादर केला बारा ज्योतिर्लिंग देखावा ; बाल भक्तांनी मिळून स्वत: हाताने बनवला देखावा
अहमदनगर । दर्शक :
गणेश उत्सव हा सण म्हणजे सर्वांचाच आवडता सण आहे यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या उत्सवाचे आतुरतेने वाट बघत असतात. प्रत्येक चौकात वेगवेगळे मंडळ प्रत्येक गल्लीबोळात वेगवेगळे मंडळ सजलेले असतात. प्रत्येक मंडळ वेगवेगळे सामाजिक उपक्रम वेगळे देखावे सादर करून हा उत्सव साजरा करत असतो. तोफखाना येथील जुने विठ्ठल मंदिर जवळ अष्टविनायक मित्र मंडळाच्या बाल कार्यकर्त्यांनी आगळावेगळा गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
अष्टविनायक मित्र मंडळाच्या बाल कार्यकर्त्यांनी बारा ज्योतिर्लिंग दर्शन देखावा सादर केलेला आहे. या देखाव्यासाठी त्यांनी कोणत्याही कारागिरांना न सांगता स्वतःच्या हातांनी सर्व बाल मित्रांनी मिळून हा देखावा तयार केला. अतिशय सुंदर आणि आकर्षक असे टाकाऊ व रद्दी वस्तू मधून म्हणजे शाडू माती, पुठ्ठा, कापूस,कार्डशिट, पाईपचा, रद्दी पेपर उपयोग करून बारा शिवलिंग म्हणजेच बारा ज्योतिर्लिंग बनवले व त्याची रंगरंगोटी करून सुंदर अशी सजावट या मंडपात करून नगर शहरातील नागरिकांसाठी हा देखावा त्यांनी बनवला.
आज मोबाईलच्या युगात अनेक खेळांपासून लहान मुलं हे दुरावले गेलेले आहेत यातच या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक आगळावेगळा संदेश देत हा देखावा सादर करून मोबाईलचा योग्य तिथेच वापर करावा त्याच्या आहारी जाऊन आपले बालपण विसरू नका असेही या देखाव्याच्या माध्यमातून त्यांनी संदेश संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
या बाल कार्यकर्त्यांनी एक महिन्यापासून या देखाव्यासाठी काम करत होते. रोज शाळेला जाऊन शाळा सुटल्यानंतर रोज एक दोन तास या देखावासाठी त्यांनी परिश्रम घेतलेले आहे. त्यानंतर हा गणेश चतुर्थीला देखावा पूर्ण झाला. परिसरातील नागरिक आणि शहरातील नागरिकांनी देखाव्याचे आणि कार्यकर्त्यांचे मन भरून कौतुक केले.
या देखाव्यासाठी अक्षता वड्डेपेल्ली, श्रेयस बोगा ,हर्षल सुंकी, सिद्धांत रायपेल्ली, मयंक येमुल, प्रज्वल रायपेल्ली, संग्राम सपाटे ,सक्षम येमुल, सिद्धांत गोंधळे, इशिका रायपेल्ली, पार्थ कांबळे, देवांश झोंड, ओम कांबळे या बाल कार्यकर्त्यांनी मिळून हा देखावा तयार केलेला आहे.
.webp)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com