Maliwada | इंग्रजी माध्यमांच्या गुगळे भगिनींनी सुरेख संस्कृत अथर्वशीर्ष पठण केले
अहमदनगर । दर्शक :
अहमदनगर मधील अशोक भाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कु आराध्य गुगळे ७ वी ,मृणाली गुगळे ६ वी या दोघींनी ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर येथे अथर्वशीर्ष पठण केले.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असताना देखील अतिशय सुरेख संस्कृत अथर्वशीर्ष न अडखळता दोघीही भगिनी ने पठण केले,आजच्या मोबाईल युगात असे संस्कारक्षम पिढी घडवणार्या माता सौ हर्षदा महेश गुगळे ह्यांचे कौतुक होत आहे,
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह छायाताई फिरोदिया,मुख्याध्यापक भाबड सर,तसेच भूषण भंडारी ह्यांनी विशेष कौतुक केले.
(छाया : महेश कांबळे अहमदनगर )

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com