लिओग्राफीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिण्याचा विक्रमा बद्दल क्रांती नाईक यांचा सन्मान
अहमदनगर : दर्शक ।
लिओग्राफी म्हणजे उलट्या अक्षरात मिरर इमेजमध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून नगरमधील क्रांती नित्यानंद नाईक यांनी अनोखा विक्रम केला आहे.त्यांच्या या विक्रमाची नोंद 'जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड फॉर इंडिया, या बुकमध्ये झाली आहे.तसेच सध्या त्या कानडी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहीत असून रामायण त्यांनी लिओग्राफीमध्ये लिहिण्यास प्रारंभ केला आहे त्याची पाहणी आ संग्राम जगताप यांनी केली व त्याचा सत्कार केला.
आ.संग्राम जगताप यावेळी म्हणाले त्याच्या या कलेमुळे नगरचे नाव जागतिक स्तरावर जाणार आहे असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले पाहिजे त्यांचे कौतुक करावे थेवढे कमी आहे,अवघड असलेले काम त्यांनी पूर्ण केले आहे.आज माणसाला लिहणे जमत नाही व त्याचे अक्षर पण सुंदर आहे. यावेळी के के शेट्टी,नित्यानंद नाईक,सौ मांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रांती नाईक या आर्मी स्कूलमध्ये होम सायन्स या विषयाच्या शिक्षिका होत्या.त्यांना विविध कलांचा छंद आहे, त्याचबरोबर लिओग्राफीमध्ये लिहिण्याचाही त्यांना अनोखा छंद आहे.या लिओग्राफीमध्ये काहीतरी अनोखे काम करावं, या उद्देशाने त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ उलट्या अक्षरात शंभर दिवसात लिहून पूर्ण केला आहे.
.webp)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com