आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
नगर - मधील आठरे पाटील पब्लिक स्कूल या शाळेमध्ये मार्च, 1991 ते 2024 पर्यतचे एस. एस. सी. परीक्षेत उत्तीर्ण झालेले सर्व माजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा डॉ
डॉ राहुल धुत व डॉ आठरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने स्नेहमेळाव्यावे उद्द्घाटन झाले. प्रमुख अतिथीं डॉ. राहुल धूत यांनी अपलया मनोगतात शालेय व्यवस्थापनाचे कौतुक केले, तसेच शाळेत आम्ही कसे घडलो, शाळेने आमच्यावर चांगलया प्रकारे संस्कार, शिक्षण दिल्यामुळे आम्ही डॉक्टर,इंजिनियर, व्यवसायिक, वकील व मोठ्या अधिकारी पदावर रुजू झालो, तसेच आमचे अनेक मित्र देश विदेशात चांगल्या प्रकारचे कार्य कतृत्व गाजवत आहेत, याचे श्रेय शाळेला व शिक्षकांना दिले, यावेळी अनेक विद्यार्थ्यानी आपली शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली, आणि बालपणीच्या आठवणीना उजाळा दिला.
या स्नेह मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते. त्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या परिसरात उत्कृष्ट प्रकारची रांगोळी, रेड कार्पेट, भव्य कमानी, मंडप, याद्वारे सजावट केलेली होती, यावेळी सकाळची प्रार्थना, शालेय मैदानावर प्रमुख अतिथींना अश्वपथक, एन.सी.सी., स्काऊट गाईड व हाऊसच्या विद्यार्थ्यांनी बँडपथकाच्या निनादावर कवायत संचालन करून मानवंदना दिली.
यावेळी घोडेस्वरांनी घोडेस्वारीची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केले तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून, विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले, हे सर्व पाहून विद्यार्थ्यांचे मन भारावून गेले होते त्यांना त्यांचे बालपणीचे सवंगडी प्रथमच भेटल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता, त्यांच्या मनात शालेय जीवनातील आठवणी जागृत झालया एकमेंकाशी गप्पा गोष्टी करणे, विचार विनिमय करणे यामुळे प्रत्येकाला वेगळेच वाटत होते, तसेच त्यांना आपल्या बालपणीच्या वर्गात जाऊन फोटो घेतले व सर्व शिक्षकांशी संवाद केला
डॉ. अनिल आठरे पाटील म्हणाले असा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दरवर्षी आयोजित केला जाईल, त्या साठी आपण न चुकता सर्वानी यायचे आहे. तसेच यावेळी शालेय सुविधांचा उपभोग घेण्याचेही आवाहन केले, शालेय मैदानावर माजी विद्यार्थी आणि शाळेतीन विद्यार्थी यांच्यात फुटबॉलचा सामना घेण्यात आला, यासाठी माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देवून, फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यानी शालेय भोजनाचा आस्वाद घेतला,
सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्यकला, गीत, स्वागतगीत, पारंपारिक वेशभूषेत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर चंद्रभान आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे पाटील, कार्यकारी विश्वस्त अॅड. विश्वासरावजी आठरे पाटील, विश्वस्त डॉ.आदिती आठरे पाटील, विश्वस्त मानसिंग आठरे पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.
स्नेहमेळावा यशस्वीतेसाठी विश्वस्त डॉ. आदिती आठरे पाटील, विश्वस्त मानसिंग आठरे पाटील, मुख्याध्यापक, प्राथमिक विभाग प्रमुख, समन्वयक, पर्यवेक्षिका व सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.मैदानी क्रीडा प्रकारांचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका कु.स्नेहल वाघमारे व विद्यार्थी चंद भानुदास व बैरागी अनुष्का यांनी केले व प्रमुख उपस्थितांचे आभार श्री. कुळधरण एम. बी. यांनी मानले. प्रमुख अतिथींचा व मान्यवरांचा परिचय प्राथमिक विभाग प्रमुख सौ. चेंबुरकर मॅडम यांनी करून दिला


0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com