Meherbaba | मेहेरबाबा नवजीवन पदयात्रा 75 वर्षे पूर्ण निमीत नगर ते मेहेराबाद पदयात्रा संपन्न 

Meherbaba | मेहेरबाबा नवजीवन पदयात्रा 75 वर्षे पूर्ण निमीत नगर ते मेहेराबाद पदयात्रा संपन्न




          नगर- अवतार मेहेरबाबांनी १६ ऑक्टोबर १९४९ रोजी नवजीवन यात्रेला प्रारंभ केला होता. तेव्हाच्या आठवणी जाग्या करण्यासाठी आज मेहेरबाबा केंद्र ,नगरच्या  विद्यमाने  नगर शहरातील मेहेर सेंटर ते मेहेराबाद समाधी अशी सुमारे अकरा कि मी  ची पदयात्रा काढण्यात आली 



          पदयात्रेचा प्रारंभ सकाळी  मेहेर सेंटर येथे  अवतार मेहेरबाबा ट्रस्ट चे विश्वासात डॉ मेहेरनाथ कलचुरी यांच्या हस्ते झाला.यावेळी हजारो मेहेरप्रेमी उपस्थित होते. यामध्ये आदिवासी पासून परदेशी भाविकासह राज्यात्तील व देशातील बाबा प्रेमी होते,लहान मुळापासून ते वयोवृद्ध माणसे पाई चालत होती 



             मिरवणुकीच्या पुढे मुलीचे लेझीम पथक, सर्वात पुढे बाबाचा सप्तरंगी भव्य ध्वज होता त्यामागे हजारो बाबाप्रेमी शिस्तबंध पद्धतीने अवतार मेहेरबाबा कि जय म्हणून चालत होते,विविध ठिकाणी चहा,पाणी व अल्पोपहारची व्यवस्था लोकांनी केली होती झेंडीगेट येथून सुरु झालेली हि पदयात्रा स्टेशन रोड, सक्कर चौक,कायनेटिक चौक मार्गे  दौंडरोड मार्गे अरणगाव येथील मंडळी हॉल मध्ये  पोहचली तिथे श्री  कलचुरी यांचे प्रवचन झाले 



        यावेळी बोलताना कलचुरी म्हणाले  नवजीवन प्रवासात मेहेरबाबा ईश्वरतत्त्वाची कवचकुंडले बाजूला सारून एखाद्या साधकाप्रमाणे साधे निर्हेतुक जीवन जगत होते. आयुष्यात येणाऱ्या सर्व आपत्तींना तोंड देण्याची त्यांची सिद्धता होती. जे शिष्य नवजीवनात सहभागी होऊ इच्छितात त्यांना बाबांनी निक्षूण सांगितले होते,



             नवजीवनात सर्वसंग परित्याग करून म्हणजे आपल्यापुरते का होईना घरादारावर तुळशीपत्र ठेवून, नातेसंबंध तोडून, इच्छा वासनांना तिलांजली देऊन अगदी संन्यस्त वृत्तीने जगायची  तयारी ठेवा.  नवजीवन पर्वात भिक्षा मागून गुजराण करायची आहे.आज इथे, तर उद्या तिथे असे भटके जीवन जगायचे आहे. भूमीचे अंथरूण आकाशाचे पांघरूण, वेळप्रसंगी उघड्यावर झोपण्याची तयारी ठेवा,असे त्यांनी सांगितले.नवजीवनात पदार्पण केल्यानंतर मागे परत फिरणे नाही, स्वगृही येणे नाही.खिशात एक पैसाही बाळगता निराधार जीवन जगणे,हा या प्रवासाचा उद्देश होता, . 


        प्रवचन नंतर पदयात्रा  पुढे मेहेराबाद येथील टेकडीवर अवतार मेहेरबाबांच्या समाधीजवळ  सांगता झाली.यावेळी भजन, प्रवचन आरती होऊन महाप्रसादाचे सांगता झाली