NCP Ahmednagar | घटस्थापनेच्या मुहुर्तावर सुरू झालेल्या ‘नगर जनसंवाद यात्रा’ला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद
अहमदनगर । दर्शक :
घटस्थापनेच्या पवित्र मुहूर्तावर सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी सुरू केलेल्या ‘नगर जनसंवाद यात्रे’ला नगरकरांकडून उस्फुर्त पाठींबा मिळत आहे. संपूर्ण मतदारसंघात पायी भ्रमण करून नागरिकांच्या समस्या समजून घेण्याच्या या उपक्रमाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
यात्रेच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. कळमकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विविध भागांना भेटी देत, स्थानिकांशी थेट संवाद साधला. या यात्रेच्या माध्यमातून बेरोजगारी, स्त्री सुरक्षा, पायाभूत सुविधा, MIDC विकास, आणि शहर विकास यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होत असून, अनेक प्रभागातील लोक आपापले प्रश्न मांडत आहेत.
अभिषेक कळमकर यांनी या यात्रेच्या उद्देशाबद्दल बोलताना सांगितले, “नगरच्या विकासासाठी लोकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. नगरवासीयांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादामुळे आम्हाला खूप आत्मविश्वास मिळत आहे, आणि आम्ही त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
यात्रेच्या पहिल्या टप्प्यात कळमकर यांनी प्रभागाना भेटी देऊन स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांनी कळमकर यांचं स्वागत करत त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.
'नगर जनसंवाद यात्रा' यशस्वीपणे सुरू असून, या यात्रेमुळे नगरच्या विकासासाठी एकत्र येण्याची भावना निर्माण होत आहे.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com