माणुसकीची भिंत उपक्रमास सावेडीत चांगला प्रतिसाद
नगर - माणसाने माणुसकी हा धर्म पाळला तर समाजातील सर्व जाती धर्मात सर्व धर्म समभाव निर्माण होईल. एकमेकांचे सुखदुःख वाटून घेण्यात मानवधर्म आहे. त्यामुळेच नको असेल ते द्या. हवे असेल ते घेऊन जा. या माणुसकीची भिंत संकल्पनेला दिवाळी सणात गोरगरीब, वंचित कुटुंब, गरजूंना मोठा आधार मिळाला आहे. दुसर्यांच्या सुखात स्वतःचा आनंद शोधा म्हणजे दुःखी कोणी राहणार नाही. असे प्रतिपादन उद्योगपती चिन्मय सुखटणकर यांनी केले आहे.
सावेडी येथे जॉगिंग ट्रॅकवर गरजूंना कपडे वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. 100ते 150जणांनी लाभ घेतला याप्रसंगी चिन्मय सुखटणकर, डॉ. दत्ता पोंदे, प्रसाद मांढरे, ईश्वर सुराणा, विनोद साळुंकी, प्रमोद छाजेड, दिलीप कोठारी, सवंगडी 82 ग्रुप, स्नेह 75 ग्रुप, एमआयडीसी उद्योजक ग्रुप लायन्स क्लब मिडटाऊन चे सदस्य उपस्थित होते.
डॉ. पोंदे म्हणाले नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा. ही संकल्पना मला सुचली या आधारे माणुसकीची भिंत म्हणून गरजूंना आधार देण्यासाठी आवाहन केल्याप्रमाणे ग्रुपच्या सदस्यांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर कपडे देऊन सहभाग नोंदविला. आज या उपक्रमात शंभर ते दीडशे गरजू लोकांना त्याचा लाभ झाला. त्यांच्या सुखात आमचा आनंद शोधण्याचा हा प्रयत्न आहे.
या वेळी योगेश श्रोत्रीय, धिरेन भळगट, संजय आहेर, सौ. रजनी ढोरजे, डॉ. अस्मिता अष्टेकर, सौ. आरती खाडीलकर, रचना काकडे, नितीन काकडे, सागर अष्टेकर, सौ. संपूर्णा सावंत उपस्थित होते.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com