नगर शहर विधानसभा सौ.सुवर्णा संदीप कोतकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल 

नगर शहर विधानसभा 225 सौ.सुवर्णा संदीप कोतकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल


नगर शहर विधानसभा 225 सौ.सुवर्णा संदीप कोतकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला त्यामुळे आता नगर शहरातील हि लढत तिरंगी होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे महाविकास आघाडी तर्फे अभिषेक कळमकर यांनीही आज अर्ज दाखल केला.



 त्यांच्या समवेत महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंके,काँग्रेसचे किरण काळे,शिवसेनेचे विक्रम राठोड तसेच त्यांचे काका माजी आमदार दादा कळमकर यांच्या समवेत महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी आदी  मंडळी उपस्थित होते. 



सुवर्णा कोतकर यांनी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयात प्रवेश करताच पत्रकार माध्यम प्रतिनिधींनी त्यांना गराडा घालून व्हिडीओ आणि फोटो घेण्यास सुरवात केली. 




महायुती तर्फे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर विरुद्ध अपक्ष उमेदवार सुवर्णा कोतकर अशी तिरंगी लढतीची शक्यता आहे अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल महाविकास आघाडीने अहमदनगर शहरात शरद पवार यांच्या तुतारीला संधी दिली मात्र स्थानिक शिवसेना आणि काँग्रेस नेते मंडळी काहीशी नाराज झाल्याचे दिसले.


Vidhansabha Election | सौ.सुवर्णा संदीप कोतकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल ; महाविकास आघाडीत  AB फॉर्मचा संभ्रम कायम ?




 आज अर्ज भरताना काँग्रेसचे इच्छुक किरण काळे आणि शिवसेनेचे इच्छुक विक्रम राठोड यांनी अभिषेक कळमकर यांच्या सोबत अर्ज भरताना येऊन एकजूट कायम आणि नाराजगी दूर झाली असे दिसले त्यामुळे महायुती विरुद्ध मविआ लढतीत अपक्ष सुवर्णा कोतकरांची भूमिका काय असणार आणि कोण बाजी मारणार याकडे सर्व नगरकरांचे लक्ष लागून राहिले आहे. 



AB फॉर्म बाबत संभ्रम कायम ?
दर्शकच्या अधिकृत सूत्रांकडून समजले कि AB फॉर्म बाबत महाविकास आघाडीने अहमदनगर विधानसभेत अजूनही अभिषेक कळमकर यांना देण्यात आले नसल्याचे अशी माहिती मिळाली असून त्यामुळे पुढे अजूनही काही अघटित घडणार असल्याचेही चर्चा राजकीय क्षेत्रात सुरु आहे.