पुणे विभाग शालेय कुराश स्पर्धेत सिद्धी दातरंगे हिला सुवर्णपदक
नगर- नुकत्याच इंदापूर येथे पार पडलेल्या पुणे विभागीय शालेय कुराश स्पर्धेत सिद्धी अशोक दातरंगे हिने ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. तिची पुणे येथे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सिद्धी दातरंगे ही भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मध्ये इयत्ता सातवी मध्ये शिकत असून ती यंग मेन्स जुडो क्लब सिद्धी बागची खेळाडू आहे. तिला राष्ट्रीय किर्तीचे मार्गदर्शक प्रा. संजय धोपावकर, आंतरराष्ट्रीय खेळाडू आदित्य धोपावकर, शालेय खेळ शिक्षक कैलास करपे, व सुनील गायकवाड, तसेच राष्ट्रीय खेळाडू पै.गणेश लांडगे, पै.शुभम दातरंगे ,अथर्व नरसाळे ,गणेश शिंदे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल तिचे पर्जन्येश्वर मित्र मंडळ, श्री एकदंत मित्र मंडळ, दातरंगे मळा मंडळाच्या वतीने तिचे सत्कार करण्यात आले. तसेच अमोल गाजेंगी, अक्षय दातरंगे, आकाश दातरंगे, आनंद दातरंगे , दत्ता दातरंगे , अमोल दातरंगे,मनसेचे वाहतूक शहराध्यक्ष अशोक दातरंगे व शिवसेनेचे उपशहर प्रमुख संदीप दातरंगे यांनी अभिनंदन केले.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com