मुकुंदनगर खून : पोलिसांनी ८ तासात आरोपीला केली अटक
नगर ।
चेष्टामस्करीतून झालेल्या वादातून मित्राचा कात्रीने पाठीत भोकसून खून करणार्याला भिंगार कॅम्प पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले होते. शमशुद्दीन निजामुद्दीन खान (रा. मुकुंदनगर) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, त्याला पोलिसांनी अटक केली असून काल, रविवारी न्यायालयाने तीन दिवसाची (4 डिसेंबरपर्यंत) पोलीस कोठडी दिली आहे.
जिशान रूस्तम अली खान, शमशुद्दीन निजामुद्दीन खान, रेहान अब्दुलहक शेख, फैजान सोहराबअली खान हे चौघे मित्र एकमेकांची चेष्टामस्करी करत असताना शमशुद्दीन निजामुद्दीन खान यास राग आल्याने त्याने मेडिकलमधील काऊंटरवरील कात्री घेऊन जिशान रूस्तमअली खान (वय 18, रा. घर नं. 23, इस्लामी बेकरीजवळ, दर्गा दायरा रस्ता, शहाजीनगर, मुकुंदनगर) याच्या पाठीत भोसकले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा शनिवारी (30 नोव्हेंबर) सकाळी मृत्यू झाला.
मुकुंदनगर भागात जिलानी मेडिकल जवळ शुक्रवारी (29 नोव्हेंबर) सायंकाळी ही घटना घडली होती. मयत जिशानचा भाऊ नसीबअली रूस्तमअली खान (वय 25 रा. घर नं. 23, इस्लामी बेकरीजवळ, दर्गा दायरा रस्ता, शहाजीनगर, मुकुंदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शमशुद्दीन निजामुद्दीन खान विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटना घडल्यानंतर शमशुद्दीन खान पसार झाला होता. तांत्रीक तपासाच्या आधारावर तो पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली.सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दीपक शिंदे, संदीप घोडके, समीर शेख, प्रमोद लहारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com