आठरे पाटील स्कूलचे दोन्ही फुटबॉल संघ आंतरशालेय फूटबॉल स्पर्धेत अजिंक्य
नगर-शहराच्या सावेडी येथील आठरे पाटील पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या वसतिगृहात्मक शाळेचा १४ वर्षांखालील मुलांचा फूटबॉल संघ आणि १७ वर्षांखालील मुलांच्या फूटबॉल संघाने उत्कृष्ट कामगिरी करत आंतरशालेय फूटबॉल स्पर्धेत शाळेच्या दोन्ही संघांनी आंतरशालेय फुटबॉल चषक पटकावला.
शहरातील वाडिया पार्कच्या भव्य मैदानावर स्टेअर्स फाउंडेशन अहिल्यानगर आयोजित व जिल्हा क्रीडा असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत शहरातील एकूण १९ शाळेच्या फूटबॉल संघाने सहभाग घेतला होता.या स्पर्धेत शाळेचे खेळाडू चंद अशोक,चंद भानुदास व गिर्जे अथर्व यांनी शाळेच्या फूटबॉल संघांना विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली.
उत्कृष्ट खेळाडू म्हणून अशोक चंद यांस गौरविण्यात आले.तर उत्कृष्ट गोलकिपर म्हणून गिर्जे अथर्व यांस गौरविण्यात आले.चंद भानुदास व टेमकर कृष्णा या खेळाडूंची राष्ट्रीय फुटबॉलच्या कॅंपसाठी निवड झाली.आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या 17 वर्षाखालील मुलांच्या फूटबॉल संघाने उत्कृष्ट अशी कामगिरी करत आंतरशालेय अंतिम सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलच्या फुटबॉल संघाचा शाळेच्या फूटबॉल संघाने ४-३ ने पराभव करून विजेता संघ ठरला. तसेच १४ वर्षांखालील मुलांच्या फूटबॉल संघानेही आपल्या कौशल्याने उत्तम कामगिरी केली . आणि अंतिम सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलच्या फूटबॉल संघाशी चुरशीची लढत देऊन १-० ने सामना जिंकला.
संस्थेच्या विश्वस्त डॉ.अदिती आठरे पाटील यांच्या हस्ते सर्व खेळाडूंना पदकं व विजेता संघास ट्राॅफी देऊन गौरविण्यात आले.तसेच यशस्वी फुटबॉल खेळाडूंचे संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉ. अनिल आठरे पाटील, कार्यकारी विश्वस्तॲड. विश्वासराव आठरे पाटील, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक, पर्यवेक्षिका, समन्वयक, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.शाळेच्या दोन्हीही फूटबॉल संघाच्या खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक संदीप दरंदले यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो- स्टेअर्स फाउंडेशन व जिल्हा क्रीडा असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत आठरे पाटील पब्लिक स्कूलचा १४ वर्षाखालील व १७ वर्षाखालील फुटबॉल संघ अजिंक्य. ठरला. संस्थेच्या विश्वस्त डॉ.अदिती आठरे पाटील यांच्या हस्ते यामधील सर्व खेळाडूंना पदकं व विजेता संघास ट्राॅफी देऊन गौरविण्यात आले.

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com