Top News

ZP School | सन फार्मा कडून जिप शाळेचे नूतनीकरण

 सन फार्मा कडून जिप शाळेला सोलर सिस्टीम,२डिजिटल रूम, बहुउद्देशीय हॉल,तसेच शाळा नूतनीकरण

सन फार्मा कडून जिप शाळेला सोलर सिस्टीम,२डिजिटल रूम, बहुउद्देशीय हॉल,तसेच शाळा नूतनीकरण





         नगर- जिल्हा परिषद शाळा शेंडी येथे सन फार्मा कंपनीच्या सीएसआर निधीतून सोलर सिस्टीम,२ डिजिटल रूम,बहुउद्देशीय हॉल, व संपूर्ण शाळा नूतनीकरण व तसेच गावामध्ये अनेक सार्वजनिक ठिकाणी सौरऊर्जेचे सौरदिवे,६ अंगणवाड्यांना डिजिटल टीव्ही देण्यात आले.शाळेतील कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गट शिक्षणाधिकारी बाबुराव जाधव,सन फार्मा कंपनीचे अधिकारी अभिजीत भाकट,दादासाहेब पाटील,संभाजी पाटील,सोमनाथ दडस,विक्रांत जोशी,



शाळा समितीचे अध्यक्ष नानाभाऊ राऊत,नवजीवन प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार,भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा संयोजक व ग्रामपंचायत सदस्य सागर शिंदे,विस्तार अधिकारी रवींद्र कापरे,केंद्रप्रमुख प्रमुख धामणे,मुख्याध्यापक भाऊसाहेब लाड,सरपंच प्रयागा लोंढे,ग्रामपंचायत सदस्य सुनील देठे,दत्ता राऊत,संतोष त्र्यबंके, बाबासाहेब पडोळे,अविनाश शिंदे आदींसह विद्यार्थी,शिक्षक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ZP School | सन फार्मा कडून जिप शाळेचे नूतनीकरण




        सन फार्मा कंपनीतर्फे गावाला व शाळेला खूप मोठ्या प्रमाणात मदत ही सन फार्मा कंपनीकडून झाली आहे त्याबद्दल त्यांचे आभार व भविष्यातही सन फार्मा कंपनी कंपनीचा नेहमीच सहकार्य राहील व त्यासाठी आम्ही पण कंपनीकडे पाठपुरावा करू असे भा.यु.मो.जि.संयोजक.द ग्रामपंचायत सदस्य सागर शिंदे व ग्रामस्थांनी सांगितले.


 

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم