Top News

Dr Vikhe Patil College | डॉ.विखे पाटील इंजिनीअरींग आय.टी. विभागातील ३२ विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे नोकरीसाठी निवड

 डॉ.विखे पाटील इंजिनीअरींग आय.टी. विभागातील ३२ विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे नोकरीसाठी निवड

Dr Vikhe Patil College | डॉ.विखे पाटील इंजिनीअरींग आय.टी. विभागातील ३२ विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे नोकरीसाठी निवड


नगर : दर्शक । 
 

विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागामार्फत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांकरीता करीअर घडवण्याच्या दृष्टीने एकुण ११ माहिती तंत्रज्ञान कंपन्यांद्वारे चतुर्थ वर्ष आय.टी. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.या मुलाखती दरम्यान विद्यार्थ्यांची प्रथम योग्यता चाचणी घेण्यात आली. त्यानंतर तांत्रिक चाचणी आणि प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे माहिती तंत्रज्ञान विभागातील एकुण ३२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.



  पूजा अनारसे सर्वांमध्ये अव्वल 

 



आय.टी. विभागातील कु. पूजा अनारसे हिचे इन्फोसिस कॉग्नीझंट आणि अॅसेंचर या तीन मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये निवड झाली. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ती म्हणाली "मी कर्जत तालुक्यातील एका ग्रामीण भागातील विद्यार्थीनी असून शहरापासून दूर असलेल्या गावात सुध्दा माझी तीन मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये निवड झाली याचा मला अभिमान आहे. महाविद्यालयाने उपलब्ध करुन दिलेल्या संधी मुळेच हे यश मिळाले. माझ्या यशाचे श्रेय महाविद्यालयातील प्राध्यापक, संस्थेचे मार्गदर्शन व पालकांचे सततचे प्रोत्साहन याला देते. हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चीत प्रेरणादायी ठरेल याची मला खात्री आहे. 



      यामध्ये मुंबई इन्फोसिस,पुणे कॉग्नीझंट टेक्नॉलॉजी, पुणे व मुंबई, कोरिझो, बंगलोर ची न्युमेट्री टेक्नॉलॉजी, पुणे फॉर्च्यून क्लाऊड टेक्नॉलॉजीज प्रा. लि.नाशिक ची पार्श इन्फोटेक प्रा.लि. सुदरलॅण्ड ग्लोबल सर्व्हिसेस,मुंबई  ईगल बाईट सोल्युशन प्रा.लि., नाशिक, 


टेक्नोग्रोथ सॉफ्टवेअर सोल्युशन प्रा.लि. पुणे, क्युस्पायडर, पुणे व मुंबई, द किरण अॅकेडमी, पुणे या आय.टी. क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना सरासरी चार लाख आणि कमाल साडेसहा लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले आहे.



        या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तसेच नगरचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील संस्थेचे डायरेक्टर जनरल प्रशासन डॉ. पी.एम.गायकवाड, 



डायरेक्टर-टेक्निकल प्रा.सुनिल कल्हापुरे व प्राचार्य डॉ.उदय नाईक, आय.टी.विभाग प्रमुख डॉ.दीपक विधाते, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफीसर प्रा.सुदर्शन दिवटे विभागीय शिक्षक समन्वयक प्रा.गणेश डहाणे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.         

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم