ज्येष्ठ नेते अरुण काका जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी बौद्ध वंदना
नगर : दर्शक । रेल्वे स्टेशन परिसरातील भिंगारदिवे परिवाराच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त व बौद्धवासी भीमसेन शंकर भिंगारदिवे, बौद्धवासी वामनराव शंकर भिंगारदिवे यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
युवा नेतृत्व अरुण नाणेकर व श्रीमती सिंधुताई भिंगारदिवे यांच्या हस्ते या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भीम अनुयायायी व परिसरातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी जेष्ठ नेते आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी बौद्ध वंदना घेण्यात आली.
भिंगारदिवे परिवारातील विलास भिंगारदिवे यांच्या संकल्पनेतून आंबेडकर जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन दरवर्षी केले जाते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शशिकांत लाटे यांचे मार्गदर्शन लागले. यावेळी वैभव भिंगारदिवे, सौरभ भिंगारदिवे, आकाश भिंगारदिवे दिनकर भिंगारदिवे, अण्णा वामन भिंगारदिवे, अर्जुन भिंगारदिवे, सागर भिंगारदि,वे मनोज भिंगारदिवे,व सिद्धार्थ भिंगारदिवे यांचे सहकार्य लाभले

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com