Ahmednagar Day | अहमदनगर शहर स्थापना दिनानिमित्त फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन

Ahmednagar Day | अहमदनगर शहर स्थापना दिनानिमित्त फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन





नगर - अहमदनगर शहराच्या 535 व्या स्थापना दिनानिमित्त मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, रहेमत सुलतान फाउंडेशन व अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने अहमदनगर शहरातील निजामशाही काळातील, 


शिवशाही काळातील व इंग्रजांच्या काळातील जुन्या इमारतींचे फोटोग्राफीची स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचे मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान यांनी सांगितले.


वरील तीनही काळातील कोणत्याही इमारतीचे फोटो काढून किंवा तुमच्याकडे संग्रहित असलेले फोटो 98 60 47 78 69 या नंबर वर किंवा abidkhan1968@gmail.com या मेलवर 31 मे 2025 पर्यंत टाकावे. यामध्ये प्रथम बक्षीस रुपये 500 द्वितीय 300 तृतीय 200 रुपये रोख व प्रमाणपत्र देण्यात येईल.असे अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाचे अभिजीत वाघ यांनी सांगितले.


तरी या फोटोग्राफी स्पर्धेत जास्तीत जास्त नगरप्रेमींनी भाग घ्यावा असे आवाहन आसिफ खान, भैरवनाथ वाकळे व युनुसभाई तांबटकर यांनी केले आहे.