Yoga Nagar | जागतिक योग दिनानिमित्त योग विद्याधाम तर्फे विशेष योग वर्ग
नगर : जागतिक योग दिनानिमित दरवर्षीप्रमाणे योग विद्या धाम अहमदनगर या संस्थेच्या वतीने दिनांक 1 जून पासून शासकीय प्रोटोकॉलसह योगासनांचा विशेष योग वर्ग घेण्यात येणार आहेत.
सदर वर्ग हे शहरातील निरनिराळ्या भागांमध्ये घेण्यात येणार आहेत अशी माहिती योग विद्या धाम चे अध्यक्ष डाॅ सुंदर गोरे यांनी दिली.
हे वर्ग योग भवन सावेडी व सिध्दबाग,गुलमोहर रोडवरील नवले हाॅल येथे होणार आहेत.तसेच ज्यांनाआपल्या मोहल्यात योग वर्ग व्हावा असे वाटते त्यांनी हॉल उपलब्ध करून दिल्यास संस्थेतर्फे योग शिक्षकाची योजना करण्यात येईल. अशी माहिती कार्याध्यक्ष जयंत वेसीकर यांनी दिली.
जागतिक योग दिनानिमित फक्त एक दिवस योग वर्ग नगर घेता सलग 40 दिवस योगाचे वर्ग घेतले जाणार आहेत. त्यामुळे लोकांना योगाची आवड निर्माण होईल व त्यामुळे नियमित योगाभ्यास केला जाईल. तरी या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन योग शिक्षक अनिरुद्ध भागवत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 0241 2421255 या नंबरवर
संपर्क साधावा .

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com