ठेकेदार व पुरवठादारांचा सन्मान - अदानी सिमेंटचा गौरव उत्सव संमेलन
Adani Cement's Nagar |
नगर - खेड्यांचा भारत वेगाने बदललाय. गावात पक्की घरं. मोठमोठ्या इमारती, गुळगुळीत सिमेंट काँक्रिटचे रस्ते दिसतात. शहरांचा झपाट्याने विस्तार होतोय. बांधकामाचा वेग अनेक पटींनी वाढलाय. मुलभूत सोयीसुविधांचं पाहता पाहता जाळं तयार झालंय. टेक्नॉलॉजीचाही वेग सुपरफास्ट आहे. अर्थव्यवस्था वेगाने घोडदौड करत आहेत. जगात भारत समृद्ध अन् संपन्न म्हणून गणला जात आहे. या सगळ्या यशात देशातील बांधकाम क्षेत्रातील उद्योगांचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन अदानी उद्योग समुहाचे सीईओ विनोद बहेती यांनी केले.
उद्योगांनाही या गोष्टीची जाणीव आहे. त्यासाठीच ठेकेदार, पुरवठादारांच्या कार्याचा योग्य सन्मान करण्याचं सामाजिक भान अदानी समूह, एसीसी सिमेंटनं जपलं. अहिल्यानगर येथील एका छोटेखानी कार्यक्रमात जिल्ह्यातील ठेकेदार आणि डीलर मंडळींना पुरस्कार देऊन त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला. अदानी समुहाच्या अंबुजा व एसीसी सिमेंट कंपनीचे संयुक्त ठेकेदार गौरव उत्सव संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनासाठी जिल्ह्यातील प्रमुख ठेकेदार आणि डीलर उपस्थित होते. अदानी उद्योग समुहाचे सीईओ विनोद बहेती यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना अदानी सिमेंट समुहाचे टेक्निकल सर्व्हिसेस हेड इंजिनिअर उमेश सोनी म्हणाले की, गावात साधं घर बांधायचं असो किंवा शहरात टोलेजंग इमारत बांधायचा असो. यासाठीचा कच्चा माल म्हणजे सिमेंट. उपलब्ध करुन देण्याचं काम देशातील प्रथितयश उद्योगांनी केलं. त्यांच्या या वाटचालीत त्यांना ठिकठिकाणच्या ठेकेदार आणि पुरवठादारांनी मोलाची साथ दिली. त्यांच्या या कामगिरीमुळेच आज सशक्त राष्ट्रनिर्माण होत आहे.
या कार्यक्रमात अदानी सिमेंट समुहाचे टेक्निकल सर्व्हिसेस हेड इंजिनिअर (वरिष्ठ अभियंता) उमेश सोनी यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. पश्चिम भारत टेक्निकल हेड इंजिनिअर जिग्नेश गांधी यांनी अदानी ग्रुपमधील दोन्ही सिमेंटच्या गुणवत्तेविषयी माहिती दिली. तसेच अदानी रिवॉर्ड कनेक्ट याबाबत माहिती दिली.
अदानी ग्रुप भविष्यात कशा पद्धतीने वाटचाल करणार आहे. त्याची दिशा काय असेल याची माहिती दक्षिण महाराष्ट्र मार्केटिंग प्रमुख सुरेस बाबू यांनी दिली. पश्चिम महाराष्ट्र टेक्निकल हेड चंद्रशेखर निघोनकर यांनी प्रास्ताविक केले. अदानी सिमेंटच्यावतीने ठेकेदारांना त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
इंजिनिअर अमरेश खमितकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी अहिल्यानगर शाखा समन्वयक सुमित चौधरी व अन्य विभागप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी दिग्विजय देशमुख, संदीप खामकर, सचिन ठाकरे, सचिन बिराज, सूरज मुंडे आदी परिश्रम घेतले.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com