Dindi Market Yard | बाजार समितीच्या वतीने निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे स्वागत
Dindi Market Yard | नगर : दर्शक ।
तीन दिवसासाठी नगरमध्ये आलेल्या त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज आषाढीवारी साठी पंढरपूरला जाणाऱ्या पायी दिंडीचे आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटयार्ड येथे आगमन झाल्यानंतर बाजार समितीच्या वतीने युवा नेते व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी सुधीर पाटील ,तहसीलदारसंजय , शिंदे बाजार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब बोठे , उपाध्यक्ष रबाजी सुळ ,संचालक मंजाबापू घोरपडे, संजय गिरवले, भाऊसाहेब भोर गुरुजी ,भाऊसाहेब ठोंबे, हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले ,बाजार समितीचे सचिव अभय भिसे ,सहसचिव गणेश सातपुते ,अण्णासाहेब जगताप आदींसह अनेक मान्यवर व संचालक मंडळ उपस्थित होते.
दिंडीतील संस्थांनच्या ह.भ.प.कांचनताई जगताप, नारायण मुठाळ, विश्वस्त राहुल महाराज सांळुखे, नवनाथ महाराज गांगुर्डे, पुजारी जयंत महाराज गोसावी, पुजारी अनिल महाराज गोसावी,मानकरी मोहन महाराज बेलापूरकर,बाळकृष्ण महाराज डावरे,निवृत्ती चोपदार,सागर दौंड,कृष्णा रायते, बैलजोडीचे मानकरी अश्वचे मानकरी आदीचे अक्षय कर्डीले सह संचालक मंडळाने शाल, श्रीफळ देऊन पुष्पहार घालून स्वागत केले.
पालखी पूजनानंतर कर्डीले यांनी केलेल्या सर्व व्यवस्थेची पाहणी केली व सूचना केल्या बाजार समितीच्या वतीने तीन दिवस मार्केट बंद ठेवण्यात आले असून संपूर्ण परिसर दिंडीकरांना देण्यात आलेला आहे तर या वारकऱ्यांच्या सेवेत सर्व संचालक मंडळ कर्मचारी असून येथील स्वच्छता,पिण्याचे पाण्याची व्यवस्था आधी सर्व कामे ते पाहत आहे
संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज यांचे जन्मोत्सवाचे ७५२ वर्ष यामुळे यावर्षी पालखी सोहळ्यात हजारो वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात आहे. पायी पालखी सोहळ्यातील दिंडी सोहळा सुखकर व व्यवस्थापन चांगले होण्यासाठी शासनाच्या माध्यमातून व स्थानिक ग्रामस्थांच्या फार मोठ्या सहकार्याने निर्मल वारी,आरोग्यदायी वारी,प्लॅस्टिकमुक्त वारी,स्वच्छतादायी वारी,सुरक्षित वारी याबरोबरच अनेक व्यवस्था करण्यात येत आहे सोयीसुविधा दिल्या. त्याचाही चांगला फायदा वारकरी भाविकांना होत आहे.
आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी स्वच्छता,आरोग्य, सुरक्षा आणि पाणी पुरवठा आदी सुविधा दिल्याने पायी दिंडीचा प्रवास आनंददायी व सुखकर होत असल्याचे असे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधि संस्थानचे पालखी प्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे यांनी सांगितले. सरकारने दिलेल्या वारकऱ्यांच्या सोयी सुविधामुळे वारीच्या मार्गावर होणारी गैरसोय आता दूर होत असल्याबद्दल अक्षय कर्डीले यांनी समाधान व्यक्त केले.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com