Dr Vikhe Patil ITI | उद्योगविश्वात ग्रामीण विद्यार्थ्यांची दमदार एन्ट्री
Dr Vikhe Patil ITI | नगर – ग्रामीण भागातील तरुणांनी औद्योगिक क्षेत्रात आपला ठसा उमठवण्याची शानदार कामगिरी करून दाखवत डॉ. विठ्ठलराव विखे पाटील इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, नगर येथील ४० प्रशिक्षणार्थ्यांनी प्लेसमेंटमधून यश संपादन केले आहे. सलग दोन दिवस घेण्यात आलेल्या कॅंपस मुलाखतींमध्ये या विद्यार्थ्यांची निवड नामवंत कंपन्यांमध्ये झाली असून संस्थेच्या गुणवत्तेला दाद मिळाली आहे.
दि. ३ जून २०२५ रोजी एपिटोम कॉम्पोनंट्स प्रा. लि., सुपा एमआयडीसी येथे घेण्यात आलेल्या कॅंपस मुलाखतीत फिटर, टर्नर, मशिनीस्ट, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक व इलेक्ट्रिशियन या ट्रेडसाठी एकूण ९५ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामधून ७ प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात आली.
यानंतर दि. ५ जून रोजी Exide Industries Ltd., MIDC, नगर या देशातील आघाडीच्या कंपनीतर्फे दुसरी कॅंपस मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत फिटर, टर्नर, मशिनीस्ट, वेल्डर, मेकॅनिक डिझेल, एम.एम.व्ही. आणि इलेक्ट्रिशियन या ट्रेडमधील ११० प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला, ज्यापैकी ३३ जणांनी यश मिळवले.
या यशामागे संस्थेने घेतलेली विशेष मार्गदर्शन सत्रे, प्रशिक्षणार्थ्यांचे तांत्रिक व संवाद कौशल्य यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मुलाखतीपूर्वी विद्यार्थ्यांना सादरीकरण कौशल्य, तांत्रिक ज्ञान आणि आत्मविश्वास वाढवण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. हे यश संस्थेच्या प्रगत कार्यशाळा, अनुभवी मार्गदर्शन, डिजिटल शिक्षण प्रणाली तसेच ऑल द जॉब ट्रेनिंग या सर्वांगीण उपक्रमांचा परिणाम मानला जात आहे.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांनी यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले की, "ग्रामीण भागातील युवकांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणे आणि त्यांना रोजगारक्षम बनवणे हेच आमचे ध्येय असून हे यश त्याच दिशेने टाकलेले ठोस पाऊल आहे."
याप्रसंगी जलसंपदा मंत्री व संस्थेचे चेअरमन मा. राधाकृष्ण विखे पाटील, डायरेक्टर जनरल डॉ. पी. एम. गायकवाड, डायरेक्टर (टेक्निकल) श्री. सुनील कोल्हापुरे, डायरेक्टर (मेडिकल) डॉ. अभिजीत दिवटे यांच्यासह प्राचार्य ए. व्ही. सूर्यवंशी, उपप्राचार्य श्री. काकडे, गटनिदेशक श्री. पठारे, श्री. भुसे आणि प्लेसमेंट अधिकारी श्री. अरुण म्हस्के यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.
या यशामुळे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आयटीआय संस्थेचे नाव औद्योगिक क्षेत्रात अधिक उजळले असून हे यश भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com