Jijau Brigade Nagar | जिजाऊ ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी वर्ष नगरसाठी अभिमानास्पद - प्रदेश अध्यक्ष सीमाताई बोके
Jijau Brigade Nagar | नगर : दर्शक । महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी जिजाऊ ब्रिगेड सातत्याने काम करते ग्रामीण भागापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आज जिजाऊ ब्रिगेड काम करते ही एक वैचारिक चळवळ आहे त्यामुळे जिजाऊ ब्रिगेडच्या प्रत्येक महिलेने महापुरुषांचे विचार आत्मसात करून वैचारिक दृष्ट्या सक्षम होणे ही काळाची गरज आहे.
महिलांनी देववादी न राहता विज्ञानवादी होऊन पुढची पिढी घडवावी अंधश्रद्धा कर्मकांड रूढी परंपरा यात अडकून न राहता सर्व गोष्टींकडे डोळसपणाने पहात चिकित्सा करावी जिजाऊ ब्रिगेड ने तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचून त्यांना या प्रवाहात आणणे गरजेचे आहे.
नगर शहरात हे काम सातत्याने जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून गेली 25 वर्ष अविरतपणे व जोमाने सुरू आहे. संस्थापक जिल्हाध्यक्ष शोभाताई जाधव व संस्थापक शहराध्यक्ष अलकाताई शितोळे यांनी लावलेल्या त्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे.
रोप्य महोत्सवी वर्षात या शहरातील दोन महिला आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष सुजाताई ठुबे व राज्य पातळीवर कार्यरत असणार्या प्रदेश कार्याध्यक्ष राजश्रीताई शितोळे या शहरासाठी व आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या या बैठकीचे नियोजन अतिशय उत्तम केल्याबद्दल आयोजक राजश्रीताई शितोळे जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट स्वाती जाधव व शहराध्यक्ष सुरेखाताई कडूस यांचे अभिनंदन करते महिला दिनानिमित्त महिलांनी आजच्या काळाप्रमाणे अपडेट राहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा अध्यक्ष एडवोकेट स्वाती जाधव यांनी संगणक सक्षमीकरण अभियान राबवले. ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
जिजाऊ ब्रिगेडचा रोप्य महोत्सवाला व आपणा सर्वांना शुभेच्छा देते असे गौरव उद्गार आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रदेश अध्यक्ष सीमाताई बोके यांनी काढले.
15 जून रोजी नगर शहरात पश्चिम महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड ची बैठक हॉटेल रोज गोल्ड येथे प्रदेश कार्याध्यक्ष राजश्रीताई शितोळे जिल्हाध्यक्षा एडवोकेट साठी जाधव शहराध्यक्ष सुरेखाताई कडूस यांनी आयोजित केली होती.
या बैठकीला मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय मार्गदर्शक व जिल्हा मराठा नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंजिनीयर विजयकुमार ठुबे, जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष इंजि सुजाता ताई ठुबे, प्रदेश अध्यक्ष सीमाताई बोके, प्रदेश कार्याध्यक्ष विभावरी ताकट, प्रदेश उपाध्यक्ष वर्षाताई माने, प्रदेश उपाध्यक्ष डॉ अश्विनी देवके, प्रदेश ज्येष्ठ मार्गदर्शक नंदाताई शिंदे, प्रदेश सदस्य शोभाताई जगताप, प्रदेश सहसंघटक विभागीय अध्यक्ष शिल्पाताई देशमुख, विभागीय उपाध्यक्ष सुरेखा भोसले उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या शहर सहकारी बँकेच्या संचालिका रेश्मा ताई आठरे, व सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई मेढे या होत्या मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ पूजन करून प्रदेश सहसंघटक डॉ कल्पना ठुबे यांनी जिजाऊ वंदना घेतली. प्रसिद्ध हॉर्स रायडर भारती शेवते यांनी शिवगर्जना करत गारद सादर केली.
स्वागत व प्रास्ताविक राजश्री ताई यांनी करताना गेल्या पंचवीस वर्षातील जिजाऊ ब्रिगेडचा चढता आलेख व इतिहास सांगितला. या रोप्य महोत्सवी वर्षाचे सर्व श्रेय आज पर्यंतच्या जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व अध्यक्ष व पदाधिकार्यांना दिले. जिजाऊ ब्रिगेडच्या वाटचालीत सदैव पाठीशी असणारे व मोलाचे मार्गदर्शन करणारे दांपत्य इंजिनीयर सुजाता ताई व इंजिनियर विजय कुमार ठुबे साहेब यांचा विशेष सन्मान आम्ही सर्व जिजाऊंच्या लेकी मानपत्र देऊन करणार आहोत हे विशद केले.
जिजाऊ ब्रिगेडची वाटचाल आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेणार्या सुजाता ताई ठुबे यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी व पदाधिकार्यांनी जास्तीत जास्त महिलांना जिजाऊ ब्रिगेड मध्ये येण्याचे आव्हान करत जिजाऊ ब्रिगेड ची दिशा व वाटचाल याबद्दल सखोल विवेचन केले.
प्रमुख पाहुण्या रेश्मा ताई आठरे यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देताना विशद केले की, प्रत्येक महिलेने सक्षम व परिपर्ण होण्यासाठी व जिजाऊंचे विचार व प्रेरणा घ्यायला हवी. त्यासाठी जिजाऊ ब्रिगेड अतिशय सक्षम पण आणि काम करते म्हणूनच आज या रौप्य महोत्सवी वर्षात ही संघटना पदार्पण करीत आहे. याचा सर्वांना अभिमान आहे.
प्रमुख पाहुण्या सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई मेढे सर्व जिजाऊंना शुभेच्छा देताना म्हणाल्या जिजाऊ ब्रिगेड ही काळाची गरज आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये अन्यायाला वाचा फोडण्याचे काम या संघटनेतून होत आहे. काम अरे ला का रे म्हणण्याची धमक आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे. आजूबाजूचा बिघडलेलं सामाजिक वातावरण निवळण्याचं काम जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून होतं व यातूनच या संघटनेचे यश दिसून येतं म्हणूनच मला जिजाऊ ब्रिगेडच्या माझ्या सर्व मैत्रिणींचा अभिमान वाटतो. असे गौरव उद्गार संध्या ताई यांनी काढले.
श्रीगोंद्याच्या प्रसिद्ध निर्भीड पत्रकार मीराताई शिंदे आपल्या मनोगतात मार्गदर्शन करताना म्हणाल्या, प्रत्येक महिलाच्या कणाकणात जिजाऊंची ऊर्जा आहे तिचा शोध घ्या. व व्यक्त होऊन वेळप्रसंगी रडणारे नाही तर लढणारे बना आजूबाजूला जर कोणावर अन्याय होत असेल तर ती स्त्री ओळखीच्या असो वा नसो तिच्या पाठीशी खंबीरपणानं उभे राहा व त्या महिलेस सर्वतोपरी मदत करा व प्रत्येक स्त्रीमध्ये जिजाऊंचा चैतन्य जागवा.
मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुरेश इथापे यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याचे कौतुक केले. मराठा सेवा संघाची विचारधारा आजच्या पिढीमध्ये रुजवणे किती आवश्यक आहे. हे विशद केले.
जिजाऊ ब्रिगेड ने इंजि.सुजाता ताई व इंजिनियर विजयकुमार ठुबे या दाम्पत्यांचा विशेष सत्कार मानपत्र देऊन केला सत्कारास उत्तर देताना ठुबे साहेब म्हणाले मला जिजाऊ ब्रिगेड ने दिलेला हा सन्मान विशेष महत्त्वाचा आहे कारण मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड माझा परिवार आहे. म्हणूनच हा सन्मान माझ्या घरातील व्यक्तींनी केलेले.
कौतुक व शाबासकीची पाठीवर थाप समजतो आमच्या आजवरच्या कामाची घेतलेली दखल याबद्दल मी आनंदी आहे. हा सन्मान मराठा सेवा संघाला समर्पित करीत आहे. सेवा संघाचे विचार रुजवण्याचे काम जिजाऊ ब्रिगेडच्या या महिला जोमाने करतात ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. माझी पत्नी सुजाता स्वतः इंजिनिअर असून स्वतःच्या करिअरचा त्याग करून आमच्या मुलांना उत्तम संस्कार व उच्च शिक्षण देऊन घडवलं आज दोघेही उच्च पदावर कार्यरत आहेत.
याचं सर्व श्रेय मी माझ्या पत्नीला देतो घरातील महिलांनी केलेल्या समर्पणातून भावी पिढी उज्वल भविष्याकडे वाटचाल करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझी पत्नी आहे. स्वतःचं करिअर बाजूला ठेवून तिने बोलून नाही तर करून दाखवलं अनेक महिलांपुढे तिने एक आदर्श ठेवला तिच्या करिअरच्या त्यागामुळे मी नोकरी व संघटने मध्ये उत्तम कामगिरी करू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे.
जिजाऊ ब्रिगेडच्या रोप्य महोत्सवी वर्षात आम्हा उभयतांची घेतलेली दखल यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत असे गौरव उद्गार मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ठुबे साहेबांनी काढले काढले.
सत्कार समारंभ नंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यांची आढावा बैठक घेण्यात आली जिजाऊ ब्रिगेड चे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते .अॅड रवींद्र शितोळे यांचे आढावा बैठकीचे ठिकाण व कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी विशेष सहकार्य लाभले. जय जाधव यांनी डॉक्युमेंट्री साठी मदत केली जिल्ह्यातील कर्तुत्वान महिलांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.
या बैठकीत महिला सशक्ति करण्याचा निर्धार करत हुंडा घ्यायचा नाही व हुंडा द्यायचा नाही या सामाजिक संदेशावर सर्वांनी एकमुखाने शपथ घेतली.शहर अध्यक्ष सुरेखाताई कडूस यांनी आभार मानले व सोनाली वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com