Sanman | आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रूल ऑफ लॉ विषयक मराठी लेखिका ॲड.गौरी लोखंडे यांचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान
नगर : दर्शक ।
न्यायव्यवस्था आणि आधुनिक तंत्रज्ञान यातील गुंतागुंतीचा परस्पर संबंध अधोरेखित करणारा ॲड. गौरी विठ्ठल लोखंडे यांचा संशोधनात्मक लेख " आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रुल ऑफ लॉ ज्युरीसप्रुडेन्सीयल ऍनॅलिसिस" या विषयावर प्रकाशित झाला असून, या लेखाचा समावेश " जुडीशियल रिव्यू स्कोप लिमिटेशन ऍण्ड ओव्हररीच" या प्रतिष्ठित इंग्रजी ग्रंथात करण्यात आला आहे. माईंड युवर लॉ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकाशन संस्थेने या ग्रंथाचे प्रकाशन केले आहे.
या ग्रंथाची प्रस्तावना सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जस्टीस हेमंत गुप्ता यांनी लिहिली असून संपादन सुप्रसिद्ध विधिज्ञ एस. के. बॉस यांनी केले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कायदा यामधील तात्विक आणि व्यावहारिक पैलू अभ्यासून लिहिलेला ॲड.गौरी लोखंडे यांचा लेख हा केवळ शैक्षणिकदृष्ट्या नव्हे, तर न्यायिक प्रणालीसमोरील भविष्यातील आव्हाने अधोरेखित करणारा अभ्यासवजा दस्तऐवज ठरला आहे.
ॲड.गौरी लोखंडे यांनी आत्तापर्यंत विविध विद्यापीठांअंतर्गत झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन विधी परिषदा ( इंटरनॅशनल लीगल कॉन्फरन्सेस) यामध्ये सहभाग घेतला असून त्यात त्यांनी पाच संशोधन निबंध सादर केले आहेत. कायदा आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालणाऱ्या विषयांवर त्यांचा विशेष अभ्यास असून, नव्या युगातील डिजिटल न्यायव्यवस्थेतील संभाव्य बदल व त्यावर होणारे कायदेशीर परिणाम यांची त्यांनी चिकित्सक मांडणी केली आहे.
त्यांच्या या यशामुळे महाराष्ट्रातील नव्या पिढीतील संशोधनवृत्तीला प्रोत्साहन मिळणार असून, कायद्याच्या विद्यार्थ्यांना आणि नव्या अभ्यासकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास अनेक विधिज्ञांनी व्यक्त केला आहे. या कामगिरीबद्दल ॲड. गौरी लोखंडे यांचे विविध स्तरांवर अभिनंदन होत असून, विधी आणि तंत्रज्ञान यामधील सखोल संशोधनासाठी त्यांनी उभारलेले योगदान हे उल्लेखनीय आहे.
विधी शिक्षणात नव्याने घडणाऱ्या समांतर बदलांचे भान ठेवत ॲड. लोखंडे यांचा लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरू लागला आहे.
.jpg)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com