Urdu School | शासनाच्या पाठ्यपुस्तके मोफत वाटप धोरणाने विद्यार्थ्यांना आनंद- हसीब शेख
Urdu School | नगर : दर्शक ।
सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासनाने सुरु केलेल्या मोफत पाठ्यपुस्तके वाटप धोरणाने प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना एक वेगळाच आनंद मिळतो. शिवाय काही शाळेतील गोर-गरीब वंचित घटकांना त्याचा लाभ होत आहे, असे प्रतिपादन हसीब शेख यांनी केले.
मुकुंदनगर येथील मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटीच्या मौलाना आझाद उर्दू गर्ल्स हायस्कूल मध्ये विद्यार्थिनींना पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक प्रा.डॉ. अब्दुस सलाम सर,मुख्याध्यापिका सय्यद फरहाना, शेख नाजेमा, सोलापूरे नाहीद, महागमी अफशा,शेख नाजेमा, सय्यद बहार अंजूम, शेख अब्दुल हसीब, खतीजतुलकुबरा, युनूस खान, शेख यास्मिन, खान मलेकाजहां, खान नफिस अंजुम, शेख मिनाज आदी उपस्थित होते.
हसीब शेख पुढे म्हणाले, शासनाच्या या उपक्रमाबरोबरच सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा विविध संस्थांनी वही,पेन, वाटप केले तर विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित होईल असे सांगितले.
याप्रसंगी प्रास्तविक मुख्याध्यापिका सय्यद फरहाना यांनी केले तर खान नफिस अंजुम यांनी आभार मानले.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com