Yoga Nagar | भाजपा व्यापारी आघाडी व जिजाऊ फाऊंडेशन च्या वतीने जागतिक योगा दिन संपन्न
नगर : दर्शक ।
शहर भाजपा व्यापारी आघाडी व जिजाऊ फाऊंडेशनच्या वतीने जागतिक योगा दिन सिताबन लॉन,मार्केटयार्ड रोड येथे मोठया उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर,जिजाऊ फाऊंडेशनच्या संस्थापिका मनीषा गुगळे,भाजपाचे सरचिटणीस प्रशांत मुथ्था व सचिन पारखी,व्यापारी आघाडीच्या अध्यक्ष महेश गुगळे,
सरचिटणीस हर्षल बोरा,उपाध्यक्ष नीरज राठोड व संजय कांगला,भिंगार मंडल अध्यक्ष लक्ष्मीकांत तिवारी ,गोपाल वर्मा,प्रशांत बुऱ्हाडे , सुरेश लालबागे, रुपेश वर्मा, आदी मान्यवरांसह सुमारे ३०० च्या वर लोक उपस्थित होते.
यावेळी योगा,नृत्य,संगीत याची माहिती देऊन उपस्थिता कडून योगा करून घेतले यावेळी बोलताना आगरकर म्हणाले आंतरराष्ट्रीय योग दिन हा मोदी साहेबामुळे सुरू झाला आहे,या दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो,योगाच्या पाठीमागे ऋषीं परंपरा जागृत व्हायला लागली आहे.योगाचे असंख्य फायदे आहे ते अनुभवले पाहिजे.स्वास्थ टिकावे समाज सुदृढ व्हावा म्हणजे देश निश्चित विकसित झालेला आपणास पाहायला मिळेल असेही ते म्हणाले.
मनीषा गुगळे म्हणायला जिजाऊ फाऊंडेशन मार्फत आम्ही विविध उपक्रम राबवत असून सिताबन लॉन या ठिकाणी रोज शारीरिक मानसिक-व्यायाम करून घेतला जात आहे,योग,प्राणायाम, हास्य,व्यायाम याची चौकट म्हणजे जिजाऊ फाऊंडेशन आहे.येथे रोज 18 ते 80 वयोगटातील स्त्री-पुरुष योगासाठी येत असतात,आमचे वैशिष्ट्य म्हणजे येथे नवरा-बायको, सासू-सुना,आई-मुलगी अशी सर्व नाती येथे एकत्र येऊन व्यायाम करतात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश गुगळे यांनी तर आभार हर्षल बोरा यांनी मानले

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com