Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयामध्ये विद्यार्थी करिअर संसद शपथविधी सोहळा संपन्न
नगर : दर्शक ।
आज महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत अहमदनगर महाविद्यालयामध्ये विद्यार्थी करिअर संसद शपथविधी कार्यक्रम जागतिक युवा दिनानिमित्त संपन्न झाला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ नोयाल पारगे म्हणाले कि, आजचा हा सोहळा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. करिअर संसद ही केवळ एक उपक्रम नाही, तर ती विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, संवादकौशल्य व जबाबदारीची जाणीव निर्माण करणारी एक सामाजिक प्रयोगशाळा आहे. आज शपथ घेणारा प्रत्येक प्रतिनिधीला आपली भूमिका समजून घेऊन , प्रामाणिकपणे ती पार पाडण्याची संधी आणि जबाबदारी त्याना मिळत आहे. त्याचे सोने त्यांनी करावे .
महाविद्यालयीन जीवन ही केवळ शिक्षणाची यात्रा नसून, व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रियाही असते. या प्रक्रियेत करिअर संसद सारखे उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्यातील जबाबदार नागरिक म्हणून घडवतात. आज आपण जे शपथविधी कार्यक्रम घेणार आहोत, तो केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारा आणि त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारा क्षण आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून डॉ तुषिता आय्यर म्हणाल्या कि ,आजचा हा सोहळा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. करिअर संसद ही केवळ एक उपक्रम नाही, तर ती विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, संवादकौशल्य व जबाबदारीची जाणीव निर्माण करणारी एक सामाजिक प्रयोगशाळा आहे. आज शपथ घेतलेल्या प्रत्येक प्रतिनिधीला आपली भूमिका समजून घेत, प्रामाणिकपणे ती पार पाडण्याची संधी आणि जबाबदारी दिली जाते आहे. हि भावना त्यांनी व्यक्त केल्या .
दिनांक 27 -06 2025 रोजी स्थापन झालेल्या करिअर संसदेतील पदाधिकारी नम्रता सिंग मुख्यमंत्री ,खान शिफा नियोजन मंत्री, सिद्धार्थ मस्के कायदा व शिस्तपालन मंत्री, हर्षिता रवारीया सामान्य प्रशासन मंत्री ,रोहित मुथ्था माहिती व प्रसारण मंत्री, आकाश सोनवणे उद्योजकता विकास मंत्री, रूपाली महाडिक स्वयंरोजगार मंत्री ,शेख शफक कौशल्य विकास मंत्री, संसदीय कामकाज मंत्री, कनोजिया स्वाती महिला व बालकल्याण मंत्री आणि रिया तिवारी सदस्य यांनी विविधमंत्री पदाच्या शपथ दिल्या. श्री यशवंत शितोळे अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा . डॉ भागवत परकाळ यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा अमोल खाडे सर यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी ईटीआय समन्वयक प्रा .जी .एस गायकवाड, करिअर कट्टा जिल्हानियोजन समिती सदस्य अश्वीनी ढोकणे ह्या उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनाअनुदान विभाग समन्वयक प्रा.डॉ सय्यद रज्जाक, महाविद्यालयाच्या रजिस्ट्रार श्रीमती कल्पलता भिंगारदिवे यांचे सहकार्य लाभले . प्रा अनुराधा पाऊलबुद्धे प्रा. शितल कुलकर्णी ,प्रा हरिता गांधी, हिरे कंचदांनी आणि प्रा.अबोली पुंड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com