Ashadhi Saptah Nagar | अरणगावला सप्ताह,अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण,रथयात्रा संपन्न
Ashadhi Saptah Nagar | नगर : दर्शक ।
आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी द्वादशीला साक्षात पांडुरंग अरणगाव(मेहराबाद)येथील
उत्सवानिमित्त आषाढी सप्ताह,अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला तर अमोल महाराज सातपुते,मनोहर महाराज शिनारे,बंडोपंत महाराज शेळके,राम महाराज पठाडे,डॉ राधाकृष्ण महाराज अकोलकर,लक्ष्मण महाराज कदम शास्त्री यांचे कीर्तन झाली.
एकादशी व द्वादशीची महापुजा संपन्न होऊन काल्याचे किर्तन झाले व नंतर महाप्रसाद संपन्न झाला.यावेळी हजारो भाविक उपवास सोडायला आले होते तर दुपारी रथ मिरवणूक पूजा युवानेते अक्षय कर्डीले ,सरपंच पोपट पुंड,उपसरपंच स्वाती शिंदे,अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे विश्वस्त मेहेरनाथ कलचुरी,रमेश जंगले,राजु प्रसाद,देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ गहीले यांच्या हस्ते झाली व रथयात्रा सुरु झाली.
मिरवणुकीत लाकडी रथ भाविक ओढत होते तर त्यापुढे वारकरी भजनी मंडळ., बंटी फसले यांचे ढोल पथक, ग्रामस्थांचे लेझीम पथक होते.
सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्री पांडुरंग बुवाजीबुवा समाधी देवस्थान ट्रस्ट,अरणगाव व पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ अरणगाव यांनी केले सर्व कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती होती.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com