Avtar Meherbaba Nagar | मेहेराबादला मौन शताब्दी मुळे हजारो मेहेरप्रेमींनी पाळले मौन
Avtar Meherbaba Nagar | नगर : दर्शक ।
अवतार मेहेरबाबानी १० जुले १९२५ पासून मौन ठेवले म्हणूंन मेहेरबाबा प्रेमींनी आज जगभरात मौन दिन पाळला,यावर्षी शताब्दी आहे त्यानिम्मित मेहेराबादला ३ दिवस शताब्दी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे तर जगभरातील मेहेरप्रेमीनी आज २४ तास मौन दिवस पाळला आहे.
नगर जवळील दौंड रोडवरील मेहेरबाबाच्या टेकडीवरील समाधीस्थळी व परिसरात हजारो मेहेरप्रेमींची उपस्थित होते तसेच लोअर मेहराबादला रोडजवळ असणाऱ्या बाबाच्या झोपडीत जेथे मौन सुरु केले होते ती आज उघडण्यात आली.
दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी दिवसभर भाविकांची दर्शनासाठी रांग लागल्या होत्या.तर परिसरात भाविक बसून होते, एकमेकांशी बोलताना ते खाणाखूणेने बोलत होते व त्यांनी २४ तास मौन पाळले,
मौन दिनानिमित्त जगातून व भारतातून मेहेरप्रेमी आले होते. यावेळी सर्वत्र शांतता होती टाचणी पडली तरी समजेल इतकी शांत वातावरण होते व समाधी परिसरात हजारो भाविकानी मौन पाळले मेहेरबाबांनी ३ वेळा मौन पाळले होते.
परंतु १० जुलै, १९२५ रोजीची सुरु केलेले मौन त्यांनी आयुष्यभर पाळले व एक शब्द कधीही उच्चारला नाही ते ३१ जानेवारी १९६९ पर्यंत ४४ वर्षांपर्यंत बोलले नाही, त्यांनी त्या काळी संवाद साधण्यासाठी एबीसीडिचा बोर्ड वापरला होता,आज तसाच आपण संगणक व मोबाईल वर वापरात आहोत तसा

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com