Ladki Bahin News July 2025 | लाडक्या बहिणींचा हप्ता 'या दिवशी' जमा होणार?
मुंबई ।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्त्याची प्रतिक्षा आहे. पण ही प्रतिक्षा आता संपली असून लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे.
या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात लवकरच हा सन्मान निधी जमा होणार आहे.निश्चित तारीख जाहीर अजूनही करण्यात आली नाही परंतु साधारण पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात जमा होतील.
महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, असं महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.
तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेदेखील पैसे जमा झाले की नाही चेक करु शकतात.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com