Social Work | एकल महिलांच्या मुलांना दर्जेदार शालेय साहित्य वाटप
नगर मधील जगदंब फाउंडेशन हे नेहमी वंचित घटकांसाठी कार्य करत आलेले आहेत. नुकतेच अशोक कुटेंच्या पुढाकारातून एकल महिलांच्या मुलांना
मोठ्या प्रमाणात दर्जेदार शालेय साहित्य वाटप करून या मुलांना शिक्षण प्रवाहात टिकून राहण्यासाठी जगदंब फाउंडेशन अंतर्गत साऊ एकल महिला समिती भरीव कामगिरी करत आहे असे उद्गार शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष व कोहिनूर मंगल कार्यालयाचे संचालक राजेंद्र उदागे पाटील यांनी शालेय साहित्य वाटप करताना काढले.
जगदंब फाउंडेशनच्या पाईपलाईन रोड भिस्तबाग चौक येथील कार्यालयात हा शालेय साहित्य वाटप व एकल महिलांना, मुलांना मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.
यावेळी जगदंब फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश लंघे, सचिव अशोक कुटे, जयश्री कुटे, विनोद ढोरजकर,अमोल निंबाळकर, प्रभू कर्डिले,बंडू आहेर आदि उपस्थित होते. तसेच जिजाऊ महिला ग्रुप,छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचे अनेक सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तेहेरंब कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या चळवळीमध्ये पूर्ण नगर जिल्हा व राज्यभर शालेय साहित्य वाटप चे सध्या काम चालू आहे असे असे अशोक कुटे यांनी सांगितले.
तसेच उराजेंद्र काळे सावेडी मंडल अध्यक्ष भाजपा, मनीषा बारस्कर- काळे यांनी देखील जगदंब फाउंडेशनच्या विनंतीवरून 25 एकल महिलांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप केले. त्याच वाटप कार्यक्रमात अशोक कुटेंच्या आवाहनानंतर लगेच उद्योजक किरण काळे, प्रसाद कुलकर्णी यांनी पुढील 35 मुलांना शालेय मदत देण्याचे मान्य करून त्याप्रमाणे निधी दिला.
एकल महिलांच्या मुलांची संख्या खूप मोठी आहे.त्यामुळे याप्रमाणे आपणही इतर दात्यांनी स्वइच्छेने पुढे येऊन अश्या निराधार मुलांना मदत केल्यास नक्कीच त्यांना जगण्याची नवीन उमेद मिळेल. मदतीसाठी संपर्क 7447785910 अशोक कुटे जगदंब फाउंडेशन यावर संपर्क करावा.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com