मार्कंडेय शाळा शिक्षक भरती प्रकरणी रिट  पिटिशन दाखल करणार-शरद क्यादर 





 

      नगर-अहिल्यानगर येथील पदमशाली विदयाप्रसारक मंडळाच्या नोंदणीक्रमांक अ.५५ या संस्थेमार्फत राबविण्यात आलेली भरती प्रक्रिया रदद करणेबाबत व शालार्थ आयडी न देणेबाबत शरद लिंगप्पा क्यादर यांनी   विभागीय शिक्षण उपसंचालकशिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे विभाग पुणे यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता त्याचे उत्तर त्यांना देण्यात आले असून या शिक्षक भरती प्रकरणी  रिट पिटिशन दाखल करणार आहे अशी माहिती  शरद क्यादर यांनी दिली 



         पत्रात म्हटले आहे कि उपरोक्त संदभीय विषयान्वये आपणांस सविनव सादर करणेत येते कीसदर संस्थेने सन २०२३ मध्ये केलेली विनापरवानगी पदभरती दिनांक ०२/०१/२०२३ चे पत्रान्वये या कार्यालयाने नाकारले नंतर संस्थेने दिनांक ११/१२/२०२३ अन्वये पदभरती साठी प्रस्ताव सादर करुन प्रकरणी दिनांक ११/१२/२०२३ रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांची संस्थेच्या पदाधिकारी यांचे शिष्ट मंडळाने भेट घेतली. तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडील सूचनांनुसार सदर शिष्टमंडळ शिक्षणाधिकारीप्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर यांचे कार्यालयात उपस्थित झाले. उपस्थित असलेल्या शिष्टमंडळामध्ये श्री. शरद लिगच्या क्यादर यांचाही  समावेश होता.



       सदर संस्थेच्या शिष्टमंडळाचे विनंती नुसार व शासन निर्णय दिनांक १०/०६/२०२२ चे शासन निर्णयातील तरतुदीनुसार व आपलेकडील पत्र दिनांक ०७/०९/२०२३ अन्वये सदर संस्थेस रिक्त पदांचे ५० टक्के पदे भरण्यासाठी दिनांक ११/१२/२०२३ चे पत्रान्वये परवानगी देण्यात आली. सदर परवानगी पत्राचे अनुषंगाने संस्थेने केलेल्या पदभरतीस या कार्यालयाने १०/०१/२०२४ अन्वये मान्यता दिली व दिनांक १६/०८/२०२४ अन्वये मान्यता दिलेल्या कर्मचारी यांच शालार्थ आयडी आदेश प्राप्त झालेले आहे.



        तसेच शालेय शिक्षण व क्रिडा विभागकडील शासन पत्र २६/०९/२०२४ अन्वये संस्थेकडील दिनांक ०४/१२/२०२४ रोजीचे पदभरतीस परवानगी मिळण्याचे प्रस्तावाचे अनुषंगांने या कार्यालयाने १६/१२/२०२४ रोजी पदभरतीसाठी परवानगी दिली. संस्थेने केलेल्या पदभरती प्रस्तावाचे अनुषंगाने शासन निर्णय दिनांक १०/०६/२०२२ चे मधील अनुसुचीनुसार पडताळणी करुन श्रीमती काकडे व श्रीगाली यांना वैयक्तिक मान्यता आदेश दिनांक १४/०२/२०२५ अन्वये निर्गमित केलेले आहेत. संबंधितांना आपले कार्यालयाकडून दिनांक १७/०७/२०२५ रोजी शालार्थ आयडी निर्गमित झाले आहेत.तथापिश्री. शरद लिगण्णा क्यादर यांनी वरील प्रकरणांचे अनुषंगाने शासकिय कार्यालयांची प्रशासकिय कार्यवाही पूर्ण झालेनंतर तक्रार अर्ज दिनांक २४/०७/२०२५ रोजी दाखल केला आहे.




          तसेच  शरद क्यादर यांचे तक्रार अर्जाचे अनुषंगाने आपणांस नम्नपुर्वक निवेदन करु इच्छितो कीशरद क्यादर यांचे म्हणण्यानुसार कार्यरत पदाधिकारी हे संस्थेचे अधिकृत पदाधिकारी नाहीततथापि,  शरद क्यादर  यांनी सदर बाब प्रथम पदभरती प्रक्रियासाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनामधील उपस्थिती वेळी  तथा तदनंतर लगेच निदर्शनास आणून देणे अपेक्षित होतेतशी भूमिका शरद क्यादर यांनी त्यावेळेस घेतलेलो नाही. व सदर गाव शाळा प्रमुख या कार्याधिकारानुसार मुख्याध्यापक यांनी या कार्यायालास अवगत करणे अभिप्रेत होते. 



         तशी कार्यवाही मुख्याध्यापक यांचेकडून झालेली नाही. तसेच शासन निर्णय दिनांक १०/०६/२०२२ मधील विवरणपत्र अ. वैयक्तिक मान्यता देताना पडताळबयाच्या चाबी मध्ये संस्था पदाधिकारी यांची खात्री करुन वे. मान्यता देणेबाबत निर्देश नाहीत. तसेच संदर्भ क्रमांक ३ व ४ अन्वये श्री क्यादर यांचेबावतचे तक्रार अर्जामध्ये आरोप प्रतीआरोप करणेत आले आहेत. त्यामुळे श्री. क्यादर यांचे तक्रारीमधील मुददे मा. धर्मादाय आयुक्त अहिल्यानगर पांचे कार्यालयाचे अखत्यारीतील आहेतअशी या कार्यालयाची धारणा आहे.