नगर सेंट्रल ऍडव्होकेट बार असोसिएशनवतीने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे रविवारी व्याख्यान
जिल्हा न्यायालय द्विशताब्दीपूर्ती व्याख्यानमाला
नगर – नगर सेंट्रल अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने येत्या रविवारी दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता बडी साजन कार्यालय, आनंद ऋषी हॉस्पिटल शेजारी येथे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्वल जी. भुयान यांचे ‘कोर्टाच्या माध्यमातून लोकशाहीचे मजबुतीकरण’ या विषयावर व्याख्यान संपन्न होणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अशोक कोठारी यांनी दिली.
जिल्हा न्यायालयाच्या द्विशताब्दी महोत्सवानिमित्त व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प संपन्न होत असून याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती श्रीमती विभाजी कंकणवाडी, न्या. रोहित जोशी, प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू जी. शेंडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात 75 वर्षे पूर्ण झालेल्या बारचे सभासद तसेच न्यायदान क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या विविध मान्यवरांचा सन्मान होणार आहे.
न्या. उज्वल जी. भुयान यांनी आसाम, नागालँड, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, अरुणाचल या राज्यात वकिली व गुवाहाटी, अगरतळा, शिलॉंग, कोहिमा, इटानगर येथील खंडपीठात यशस्वी वकिली केली आहे. ते आयकर विभागाचे वकील, सरकारी वकील, महाधिवक्ता, मुंबई व तेलंगणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणूनही कार्यरत होते. जुलै 2023 पासून ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. कायदे शिक्षणाशी निगडित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आहे.
बार असोसिएशनचे कार्यकारी समिती सदस्य व सर्व सभासद या सोहळ्याचे नियोजन परिश्रमपूर्वक करीत आहेत.
या अभ्यासपूर्ण व्याख्यानाचा कायदे अभ्यासकांनी लाभ घेण्याचे असोसिएशनने आवाहन केले आहे.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com