Govindpura News | खाजगी भूखंड धारकाने रहदारीचा रस्ता भिंत टाकून अचानक केला बंद
नगर - गोविंदपूरा मुकुंदनगर येथील पी.ए.इनामदार शाळेत जाण्यासाठी शहरातून येणाऱ्या पालकांना,शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि छोटया स्कुल व्हॅन तसेच महिला आणि ज्येष्ठ नागरिक आपल्या पाल्यांना शाळेत पोहचविण्यासाठी तारेवरची कसरत करत आहेत.
मागील अनेक वर्षांपासून या शाळेत येण्यासाठी डीएसपी चौक येथून गोविंदपुरा आणि पुढे गुरूद्वारा पासून जिल्हा परिषद शाळा आणि पी.ए.इनामदार शाळे कडे मनपाचा अधिकृत रस्ता होता आणि आजही आहे परंतु खाजगी भूखंड धारकाने हा रहदारीचा रस्ता भिंत टाकून अचानक बंद केला.
त्यामुळे या रस्त्यावरून पुढे जाणे येणे पूर्णतः बंद झाले.नगर मनपाचा डांबरी रस्ता अचानकपणे बंद करण्यात आला.त्यामुळे शहरातून येणाऱ्या पालक आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असून अक्षरशः कचराकुंडीतुन रोज जावे लागत आहे.
शाळा प्रशासनास सांगितल्यास त्यांचे म्हणणे आम्हाला बाहेरचा काही घेणे देणं नाही. येथील लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासनाने जातीने लक्ष घालून गोविंदपूरा गुरुद्वारा पासून जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता तातडीने वाहतुकीस खुला करावा अशी सर्व पालक आणि शालेय विदयार्थ्यांची मागणी आहे.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com