नोंद वगळली नाहीतर अधिकारी -ग्रामस्थ संघर्ष अटळ-जालिंदर कदम
नगर : दर्शक ।
नगर तालुक्यातील मांजरसुंबा ग्रामपंचायतीला विचारात न घेता पूर्वीपासून गावाची असलेली व १९६० साली ग्रामपंचातीचे नाव लागलेली क सध्या ताब्यात असलेली गट नंबर्स 1,2 32 व 307 यांची महाराष्ट्र शासनाच्या वन राखीव फेरफार क्रमांक 942 मध्ये झालेली चुकीची नोंदणी रद्द करण्याची मागणी गावाचे उपसरपंच जालिंदर कदम , सरपंच रुपाली कदम यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
या जमिनीवर शाळा , मांजरसुभा गड ,हनुमान मंदिर,डोंगर,स्मशान भूमी हत्तीची मोट आदीं आहे २००६ साली हि नोंद लागली आहे व हि जमीन वन विभाग ताब्यात मागायला आल्यावर गावाला समजले त्यामुळे गावात तणाव आहे आजपर्यंत वन विभागाला गावाने सहकार्य केले आहे पण कागदपत्रे न पाहता नाव लावले गेले हि नोंद वगळली नाहीतर अधिकारी-ग्रामस्थ संघर्ष अटळ आहे अशी माहिती जालिंदर कदम कदम यांनी दिली.
या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, “मौजे मांजरसुंबा गावच्या ताब्यातील व शेतीयोग्य असलेल्या जमिनीची गट नोंदणी वन राखीव म्हणून दाखल करण्यात आली आहे. ही नोंदणी करताना ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थ यांची कोणतीही मते विचारात घेतली गेली नाहीत.
हा स्पष्ट अन्याय असून ग्रामस्थांच्या उपजीविकेवर याचा परिणाम होणार आहे.” या प्रकरणी प्रांताधिकारी कार्यालयाकडून तहसीलदार, वनविभाग, मंडल अधिकारी व तलाठी यांना नोटीसद्वारे फेरअहवाल मागविण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात 18 ऑगस्ट 2025 रोजी सुनावणी (Hearing-Argument) निश्चित करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, “सदर सुनावणीदरम्यान वनविभागाला योग्य ती सूचना देऊन फेरफार क्रमांक 942 रद्द करून गावकऱ्यांचे हक्क अबाधित ठेवावेत.”यासंदर्भात ग्रामस्थ व सरपंचांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की, पालकमंत्री विखे पाटील स्वतः लक्ष घालून हा वाद मिटवतील आणि मांजरसुंबा गावाचा न्याय होईल यावेळी प्रातांधिकारी सुधीर पाटील व वनविभागाच्या सहाय्यक वन सवरक्षक अधिकारी श्रीमती दिघे याना जागेवरच जालिंदर कदम यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले व नीट पाहून घ्या असे सांगितले
.webp)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com