भाजपा सावेडी मंडलातर्फे मंगळागौरी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
नगर : दर्शक ।
भारतीय संस्कृतीत सण उत्सवाला खूप महत्त्व आहे.भाजपा सावेडी मंडलाने महिलांसाठी एक आदर्श, स्तुत्य असा उपक्रम राबवला आहे. महिलांना खरे तर आपले हिंदू जुने खेळ दाखवून देण्याची संधी मिळाली असून त्यासाठी त्यांची तंदुरुस्ती देखील महत्वाची ठरणार आहे. मंगळागौर सण हा सर्वांना आनंद देणारा सण आहे.पवित्र श्रावण महिन्यामध्ये मंगळागौर सण साजरा करण्यात येतो.मंगळागौर खेळ ही महिलांसाठी खास पर्वणीच आहे.भारतीय जनता पार्टीचे सावेडी मंडळाच्या वतीने महिलांसाठी मंगळागौर खेळाची स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पडत आहे.यामुळे महिलांना प्रोत्साहन मिळणार आहे.असे प्रतिपादन धनश्रीताई विखे पाटील यांनी केले आहे.
सावेडी येथील माऊली सभागृहात भारतीय जनता पार्टी सावेडी मंडलातर्फे महिलांसाठी प्रथमच घेण्यात आलेल्या मंगळागौर स्पर्धेचे उद्घाटन धनश्रीताई विखे पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते,माजी जिल्हाध्यक्ष ॲड.अभय आगरकर,सावेडीचे मंडलाध्यक्ष सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा,उद्योजक के के शेट्टी,प्रदेश राज्यपरीषद सदस्य सुनील रामदासी ,सरचिटणीस महेश नामदे, सचिन पारखी,सावेडी मंडल अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर काळे,प्रशांत मुथा,सचिव गोपाल वर्मा, अनिल ढवण ,वैभव लांडगे,मयूर बोचुघोळ,उद्योजिका
आपल्या प्रास्ताविकात बोलतांना सावेडी मंडलाध्यक्ष सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे यांनी सांगितले की, श्रावण महिन्यात अशा प्रकारच्या स्पर्धा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये होत असतात परंतु यंदा आपण प्रथमच अहिल्यानगर शहरात सावेडी मंडलातर्फे महिलांसाठी अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. संपूर्ण शहरातून या स्पर्धेसाठी एकूण १३ संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. महिलांच्या या स्पर्धेमुळे आपली जुनी संस्कृती, जुने खेळ जपले जातील, त्याला प्रोत्साहन मिळेल. अशी इच्छा व्यक्त केली.
स्पर्धेसाठी यशश्वीतेसाठी भाजपा सावेडी मंडलाचे महिला मोर्चाचे सर्व पदाधिकारी प्रिया जानवे, गीता गिल्डा, रेणुका करंदीकर, शारदा होशिंग, वंदना पंडित, प्रतिक्षा रसाळ, कालिंदी केसकर, सविता मोरे, अर्चना बनकर, सोनाली फाटक, सुरेखा जंगम, राखी आहेर, पल्लवी जाधव,श्वेता झोंड, उज्वला भांगे तसेच नितीन शेलार, रामदास आंधळे, साहिल शेख, संपतराव नलवडे, वैभव झोटिंग, सुधीर मंगलारप, अनिरुद्ध घैसास, पुष्कर कुलकर्णी, युवा मोर्चा अध्यक्ष अभिषेक वाकळे, हेमंत पवार, अक्षय गांगर्डे, अभिजीत गायकवाड इ. परिश्रम घेत आहेत.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com