Andolan Nagar | भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर काम बंद आंदोलन प्रांरभ
Andolan Nagar | नगर : दर्शक ।
भूमि अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्
भूमि अभिलेख विभागातील सर्वेअर यांना पोलिस बंदोबस्ता शिवाय मोजणी करणे किती जोखमीचे आहे हे अलिकडील काही गंभीर घटनांवरुन आपले निदर्शनास आले असेलच. त्याच प्रमाणे विभागातील कर्मचाऱ्यांचे कामकाज हे लिपीक संवर्गाचे नसून तांत्रिक दर्जाचे व क्षेत्रीय स्तरावरील अतिशय जोखमीचे आहे. असे वर्षानुवर्षे शासन प्रशासन यांचे निदर्शनास आणून देत आहोत, परंतू त्याकडे हेतू पुरस्सर दुर्लक्ष होत आहे.
या अनुषंगाने दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ पासून भूमि अभिलेख कर्मचारी कृती समितीने संपूर्ण राज्यभर असहकार आंदोलन (फक्त कार्यालयीन कामकाजाचा निपटारा करणे, मोजणी प्रकरणातील अभिलेख अदयावत करणे) । अर्जित रजा घेणे / बेमुदत कामबंद आंदोलन करणे अशा प्रकारे शासनाचे सनदशिर मार्गाने लक्ष वेधण्यासाठी टप्या टप्याने आंदोलन घोषीत केले आहे. याबाबतची रितसर नोटीस सर्व संबधीताना यापुर्वीच संदर्भिय पत्राने देणेत आलेली आहे.
मागण्या मान्य न झाल्यामुळे आजपासून नगर मध्ये कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे तरी आमच्या मागण्यांचा सहानुभुतीपुर्वक विचार करावा असे आवाहन सरकारला रवी डिक्रूज, विभागीय अध्यक्ष भूमि अभिलेख कर्मचारी संघटना नाशिक प्रदेश, नाशिक,उमेश कोदे, भूमि अभिलेख कर्मचारी संघटना सल्लागार अहिल्यानगर,प्रविण बोरुडे, सह-सचिव भूमि अभिलेख कर्मचारी संघटना अहिल्यानगर, प्रदीप अवचर,संघटक भूमि अभिलेख कर्मचारी संघटना, मिलिंद भिंगारदिवे,संग्राम लवांडे,शशिकांत धस, अविनाश ठोकळ आदींसह धरणे धरून बसलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी केले आहे
.webp)
إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com