Top News

Women's Day Satkar | अनुजा कांबळे यांचा महानगरपालिकेने कर्तृत्वान महिला म्हणून केला सन्मान

 Women's Day Satkar |  अनुजा कांबळे यांचा महानगरपालिकेने कर्तृत्वान महिला म्हणून केला सन्मान

Women's Day Satkar |  अनुजा कांबळे यांचा महानगरपालिकेने कर्तृत्वान महिला म्हणून केला सन्मान



       



 Women's Day Satkar | नगर : दर्शक । जागतिक महिला दिनानिमित्त अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये अनुजा कांबळे यांचा पद्मश्री बिजमाता राहीबाई पोपेरे यांची हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.




           याबाबत बोलताना अनुजा कांबळे म्हणाल्या मी काम केलेली मराठी फिल्म " मदार " हीला फीप,पुणे फिल्म फेस्टिवल चे पाच पुरस्कार मिळाले. आणि महाराष्ट्र शासनाचा 15 लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला तसेच आमची फिल्म कांस फेस्टिवल साठी महाराष्ट्र शासनाने पाठवली. याबद्दल व माझ्या इतर सामाजिक कार्याबद्दल व राबविलेल्या उपक्रमाबद्दल माझी दखल घेण्यात आली त्यासाठी मी सर्वांचीच व खास करून नगरसेविका आशाताई डागवाले यांची खास आभारी आहे.




      यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महानगरपालिकेच्या सर्व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



     महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत समाजात प्रेरणा निर्माण करणारा हा सोहळा महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात पार पडला.      

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم