Nagar Police | अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्यासह दहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर
Nagar Police | नगर : दर्शक । दि ३० एप्रिल २०२६ ।
महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या मानाच्या पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्राची घोषणा करण्यात आली आहे. सन २०२५ या वर्षासाठी अहिल्यानगरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे यांच्यासह जिल्ह्यातील १० पोलीस अधिकारी व अंमलदारांना या बहुमानाने गौरवण्यात आले आहे. या यशाबद्दल पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सर्व सन्मानितांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी या पदकांची घोषणा केली असून, गुणवत्तापूर्ण सेवा आणि शौर्याबद्दल हे सन्मान प्रदान करण्यात आले आहेत. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते अंमलदारांपर्यंत सर्वांनी विविध विभागांत केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल राज्य स्तरावर घेतली गेल्याने जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, पोलीस निरीक्षक प्रवीण पुंडलिक साळुंखे, पोलीस निरीक्षक मुक्तारखान गुलजारखान पठाण, पोलीस निरीक्षक प्रल्हाद भानुदास गीते, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद दादाबा गोल्हार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर नामदेव शेजवळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय नारायण नगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय जबाजी खंडागळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पोपट गांगुर्डे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र आप्पासाहेब सुद्रिक यांचा या पुरस्कारांमध्ये समावेश आहे.
अहिल्यानगर पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि निष्ठेने आपली सेवा बजावली आहे. त्यांच्या या कर्तृत्वाचा राज्य स्तरावर गौरव होणे, ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी व्यक्त केली.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com