Ahmednagar College: कु.नेहा चव्हाण हीची नाथ बायो जीन्स प्रा. लि. कंपनीत संशोधन विकास अधिकारीपदी निवड ; अहमदनगर महाविद्यालयाचे वतीने तिचा सत्कार
Ahmednagar College: अहमदनगर (प्रतिनिधी) - अहमदनगर महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागामधील विद्यार्थी कु नेहा सुरेश चव्हाण हिची नाथ बायो जीन्स, प्रायव्हेट लिमिटेड, संभाजीनगर या कंपनीत संशोधन आणि विकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. या निवडीबद्दल अहमदनगर महाविद्यालयाच्या वतीने कु. नेहा चव्हाण हिचा प्राचार्य डॉ. आर.जे. बार्नबस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वनस्पती शास्त्र विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.
नुकतीच अहमदनगर महाविद्यालय मध्ये कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतातील विविध कंपन्या सहभागी झाले होते. त्या मुलाखतीत महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. त्यामध्ये कु.नेहा चव्हाण हिची निवड झाली. तिला वार्षिक मानधन दोन लाख चाळीस हजार रुपये देऊन संशोधन विकास अधिकारी म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. आर.जे.बार्नबस म्हणाले की, विद्यार्थ्यांना चांगली नोकरी मिळावी यासाठी महाविद्यालयाचा नेहमीच प्रयत्न असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध नवनवीन शिक्षण पद्धती शिकविण्यात येत असल्याने आज अहमदनगर महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात महाविद्यालयाचे आणि कुटुंबाचे नालोकिक करत असताना असे सांगून कु.नेहा चव्हाण हिची निवड झाल्याबद्दल कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्काराला उत्तर देताना कु. नेहा चव्हाण म्हणाली की, महाविद्यालयाचे आणि प्राध्यापकांचे वेळोवेळीचे मार्गदर्शनामुळेच माझी ही निवड झाली. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना प्रत्येक विषयाची सखोल अभ्यास दिल्यामुळेच आज मी या मुलाखतीत यशस्वी झाले. या सत्कारामुळे माझी जबाबदारी अजून वाढली आहे. आई-वडिलांचे अपेक्षा पूर्णपणे खरं करण्याचा माझा कायम प्रयत्न राहील.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com