Dr.Paulbudhe College: डॉ.पाउलबुधे फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीची कॅम्पसमध्ये पुणे येथील कंपनीत निवड
महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागात पार पडलेल्या मुलाखतीमध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये शिवकन्या पवार व पूनम डमाले यांनी निवड करण्यात आली. पुणे येथील इनजिनिअस हेल्थ केअर या नामांकित कंपनीत चांगले पॅकेज मिळाले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या मुलाखतीमध्ये प्रथम अॅप्टीट्युट टेस्ट व नंतर एच.आर.राऊंड घेण्यात आला, असे प्लेसमेंट विभागप्रमुख दुर्गेश पवळे यांनी सांगितले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विनय पाउलबुधे, पदाधिकारी रामभाऊ बुचकुल, सौ.नम्रता जगधने, रामकिसन देशमुख, दादासाहेब भोईटे, साई पाउलबुधे, रघुनाथ कारमपुरे, बी.एड्. कॉलेजच्या प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, बी. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.निलेश जाधव, डी.फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या अनुराधा चव्हाण, ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख दुर्गेश पवळे, मोहसीन शेख, सुधीर गर्जे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com