Satkar: तोफखाना पोलिसांचा शिवनगरचे नागरीक व नगरसेवकांच्या हस्ते सत्कार
Satkar: अहमदनगर (प्रतिनिधी) : पोलिस हे जनतेचे मित्र असल्याने नागरिकांच्या सुरक्षितेसाठी कायम सेवेत असतात. पोलिसांचा धाक गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. तरीही गुन्हेगार नवीन युक्त्या काढून गुन्हे घडतच आहेत. सावेडी उपनगरातील शिवनगर येथील सिद्धेश्वर मंदिर, डोकेनगर मधील साईबाबा मंदिर तर सूर्यनगर च्या गणेश मंदिरातील दानपेट्या फोडणार्या गुन्ह्यांचा तपास तातडीने लावून दोन आरोपींना अटक केली. पोलिसांच्या तत्परतेने गुन्हेगारी रोखण्यास मदत होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केले.
सावेडी उपनगरातील शिवनगर येथील सिद्धेश्वर मंदिराच्या दानपेटी फोडून फरार झालेल्या गुन्हेगारांना अटक केल्याबद्दल तोफखाना पोलिसांचा शिवनगर चे नागरिक व नगरसेवक श्री.निखिल वारे, बाळासाहेब पवार, सुनिल त्र्यंबके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बबनराव नागरे, बाळासाहेब आंधळे, अनिल काळे, अशोक पाटसकर, राजेश सोनवणे, अशोक जाधव, देवीदास आंबेकर, महेंद्र पांधे, नवनाथ वांढेकर, विकास आंबिलवादे व रहिवासी उपस्थित होते.
तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक मधुकर साळवे उपनिरिक्षक समाधान सोळंके यांचा शाल, श्रीफळ, बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पो.हे.कॉ.दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाठ, अविनाश वाकचौरे आदिंसह दहिफळे दादा, आव्हाड सर, मोहोळे गुरुजी, रणखांब साहेब, राशिनकर साहेब, कबाडी काका, राजू बगाडे, लहू बडे, अक्षय आंधळे, लोखंडे काका आदि उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देतांना पो.नि.मधुकर साळवे म्हणाले, गुन्हेगारी वाढत असली तरी पोलिस त्याचा तपास नवीन तंत्रज्ञानाच्या आधाराने करीत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल लोकेशन, ट्रॅकींग यामुळे गुन्ह्याचा तपास लवकर लावण्यास मदत होते. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिस दोन पाऊल पुढेच आहेत, असे ते म्हणाले. यावेळी देवस्थानच्यावतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.
.jpg)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com