सय्यद सैफअली सफीऊद्दीन सर जीवनगौरव पुरस्कार सोहळा!
Sultana Chandbibi: अहमदनगर (प्रतिनिधी) : येथील इतिहासप्रेमी मंडळ आयोजित मरहूम डॉ.मिर्झा मुहम्मद खिज़र लिखित सुलताना चांदबीबी ग्रंथप्रकाशन आणि सय्यद सैफअली सफीऊद्दीन सर जीवनगौरव पुरस्कार सोहळा दि.१३ जुलै रोजी चांदबीबी स्मृतीदिनानिमित्त गुरुवार दि. १३ जुलै २०२३ रोजी सायं. ५.३० वाजता रहेमत सुलतान हॉल, सर्जेपुरा, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन इतिहासप्रेमी मंडळाचे इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, असिफखान दुलेखन, भैरवनाथ वाकळे आणि युनूस सुलतान तांबटकर यांनी केले आहे.
अधिक माहीती देताना त्यांनी सांगितले की, भारतातीलच नव्हे तर जगातील शूरवीर स्त्रीयांमधे अहमदनगरच्या कन्या आणि विजापूरच्या सुनबाई असलेल्या सुलताना चांदबीबी यांचे गौरवाने नाव घेतले जाते. त्याकाळी बोटावर मोजण्याएवढ्या कर्तृत्ववान स्त्रीया जगातील सत्ता चालवत होत्या,त्यामध्ये सुलताना चांदबीबी या अग्रभागी होत्या.
त्यांचा गौरवशाली इतिहास व कर्तृत्व जगभरातील विद्यापीठांमधे शिकविला जाते. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथील मरहूम डॉ.मिर्झा मुहम्मद खिज़र यांनी सुलताना चांदबीबी यांच्यावर ग्रंथ लिहला परंतु ते आता आपल्या मधे नाहीत, त्यांच्यानंतर या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येत आहे. मरहूम डॉ. मिर्झा मुहम्मद खिज़र हे मोठे विद्वान इतिहास संशोधक होते. त्यांनी आपल्या आयुष्यात शिक्षण व इतिहास क्षेत्रातील अनेक महत्वाचे लिखाण करून ठेवलेले आहे. त्यांना जगभरातील इतिहासप्रेमी विसरणार नाहीत.
अहमदनगरचे भूमिपुत्र सय्यद सैफअली सफीऊद्दीन सर माजी प्राचार्य अंजुमन -ए -तरक्की उर्दू, चाँद सुलताना हायस्कूल व ज्युनियर कॉलेज अहमदनगर यांचे इतिहासक्षेत्रात लेखन, विश्लेषण,उर्दू भाषेतील ग्रंथांचे देवनागरी लिपीत रुपांतर तसेच शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान हे अहमदनगरसाठी भूषणावह असल्याने त्यांना अखंड अहमदनगरकरांच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आसिफखान दुलेखान असून प्रमुख उपस्थिती प्राचार्य सय्यद सैफअली सफीऊद्दीन सर,प्रा.डॉ.अज़िज़ अंबेकर सर, प्राचार्य अब्दुल क़दिर गुलाम सर, प्रा.बहार अंजुम वहाब सय्यद आणि रैयान अली फारूक़ी असणार आहेत. अधिक माहितीसाठी मंडळाच्या ९२२६७३३९९२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आयोजकांनी कळविले आहे.
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com