Ahmednagar College: बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन विभागातील विद्यार्थ्यांच्या वतीने प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांचा सत्कार
Ahmednagar College: अहमदनगर - अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्ली सरकारचा राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्याबद्दल त्यांचा अहमदनगर महाविद्यालयातील बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन विभागातील विद्यार्थ्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना कृतज्ञता संदेश दिला तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, प्राचार्य डॉ.आर. जे.बार्नबस हे त्यांचे प्रेरणास्थान असून त्यांनी विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहित केले. तसेच वेळोवेळी विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी आल्या तर त्यांनी त्या दूर केल्या. विभागासाठी सर्व पायाभूत सुविधा व तांत्रिक सुविधा पुरवल्या त्याबद्दल ते सतत ऋणी राहतील, असे आपल्या भाषणातून भावना व्यक्त केला.
याप्रसंगी विभाग प्रमुख डॉ. तूषिता अय्यर व सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com