Drawing Competiton: राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न
Drawing Competiton: अहमदनगर (प्रतिनिधी) सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात चांगले करिअर घडविण्यासाठी आयोजित होणार्या स्पर्धामध्ये सहभाग घेऊन गुणवत्ता सिद्ध करावी. नगरमध्ये सावेडी उपनगरात प्रथमच राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.
अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. राज्यातून आलेले विद्यार्थी, चित्रकला मध्ये रमून गेले. स्पर्धेच्या माध्यमातून कला-गुणांना वाव मिळाला. बक्षीसांमुळे प्रोत्साहन मिळाले. भविष्यात या स्पर्धकांना मोठ्या प्रमाणावर यश मिळवण्याची संधी देऊ, असे प्रतिपादन माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केले.
सावेडी उपनगरात जगदंब युवा प्रतिष्ठान व आंधळे कोचिंग क्लासेस आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण सात गटातील प्रत्येक गटातील पाच अशा 35 विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेविका सौ. रुपालीताई वारे, अनिल आंधळे, अनिल काळे, सर्व परिक्षक,पालक, कार्यकर्तेउपस्थित होते.
श्री.वारे पुढे म्हणाले, नगर जिल्ह्यातील प्रथमच अशा प्रकारे स्पर्धा झाली. साडे आठ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रचंड प्रतिसादामुळे विद्यार्थ्यांची स्पर्धेत भाग घेण्याची किती तयारी असते हे अनुभवले. तर त्यामुळे आमचे मनोबल वाढले. स्पर्धेतील विजेत्यांना मिळालेल्या बक्षीसांमुळे त्यांना प्रेरणा मिळेल, असे सांगितले.
यावेळी परिक्षक म्हणून अनिल काळे यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, स्पर्धेत राज्यातील विविध शाळांमधील स्पर्धक सहभागी झाले होते. एकूण 7 गटात ही स्पर्धा झाली. चित्रकलेसाठी स्वच्छ भारत अभियान, चंद्रयान मोहिम, हर घर तिरंगा या विषयांपैकी एक विषय देण्यात आला होता. सात गटातील एकूण 35 विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र, बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर होते. सहभागी सर्वांना प्रमाणपत्र व शालेय साहित्य देण्याची सोय करुन सर्वांना ते पोहोच होईल, असे त्यांनी सांगितले.
राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : गट क्र.1 (अनुक्रमे) - कबीर जगताप, अर्णव खरात, रिषी दुधे, रियांश पासकंठी, स्वरा नाईकवाडे.
गट क्र. 2 - अनबी आगळे, उत्कर्षा वाघुले, स्वरा होळकर, राघव देशपांडे, किमया जगताप.
गट क्र.3 - श्रेयश गाडे, श्रावणी सुपेकर, स्वराज चव्हाण, नाविन्या बडगु, श्रेया नाईकनवरे.
गट क्र.4 - राजनंदनी जाधव, वृंदा घोडे, मच्छिंद्र खिलारे, अवधूत पालवे, प्रज्ञा सोनार. गट क्र. 5 - अनुष्का कराळे, अर्णव येणे, आर्या निंबाळकर, आकांक्षा दळवी, सौम्या जाधव.
गट क्र.6 - संस्कृती ढवळे, जानवी खाडे, समर्थ पठारे, सिद्धांत कार्ले, मांगल्या धोत्रे. गट क्र. 7 - हरिष चौधरी, प्रशांत पाटील, ईशा सादूल, संकर्षण धर्माधिकारी, श्रावणी कुलकर्णी आदि. स्पर्धेसाठी 25 परीक्षकांनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी जगदंब युवा प्रतिष्ठान चे श्रीनिवास कासार, विनीत पोकळे तसेच सर्व कार्यकर्ते, मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले या सर्वांचे निखिल वारे यांनी आभार मानले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com